लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आनंदाचे पर्व ईद-उल-फितरचा शहरात उत्साह होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत, पहिल्यांदाच घरातच ईद-उल-फितरची विशेष नमाज अदा केली. बहुतांश कुटुंबियांनी घरातील सदस्यांमध्ये शारीरिक अंतर ठेवत ईदेची नमाज पठण केली. त्यानंतर खुतबा सुद्धा पठण केले. यानिमित्त देशाच्या सुरक्षेसाठी व कोरोनाशी लढणारे डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार यांच्या सुरक्षेसाठीसुद्धा दुवा मागितली.बंद राहिले ईदगाह, मशिदीतून केले आवाहनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ईदगाह बंद होते. जाफरनगर ईदगाह कमिटीने एक दिवसांपूर्वी आवाहन केले की, घरातच नमाज पठण करावे. तसेच शहरातील मशिदींमधून लॉकडाऊनचे नियम पाळण्याासाठी व घरातच नमाज अदा करावी, यासाठी आवाहन करण्यात आले होते.कब्रस्तान होते बंदईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव दिवंगत झालेल्या कुटुंबीयांच्या कबरीवर फातिहा पठण करण्यासाठी कब्रस्तानात जातात. परंतु यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाने लॉकडाऊन केल्याने, कब्रस्तानमध्ये गर्दी होऊ नये म्हणून कब्रस्तान बंद ठेवले होते.मेडिकलच्या पारिचारिकांनी बनविला शीरखुरमामेडिकलमध्ये ५० पेक्षा जास्त कोरोना संक्रमित रुग्ण आहे. यात बहुतांश रुग्ण हे मुस्लिम आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमित रुग्णांसाठी मुस्लिम परिचारिकांनी पुढाकार घेत शीरखुरमा तयार केला. कोविड हॉस्पिटलमध्ये भरती सर्व रुग्णांना ईदच्या शुभेच्छा देत शीरखुरमा वितरित केला. मेडिकल मेट्रन मालती डोंगरे यांच्या पुढाकाराने शहजाद बाबा खान, जुल्फेकार अली, अमीन अली खान, सायमन माडेवार आदी परिचारिकांच्या मदतीने मेडिकलच्या किचनमध्ये शीरखुरमा तयार केला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी रुग्णांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नागपुरात साधेपणाने साजरी झाली ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:54 PM
आनंदाचे पर्व ईद-उल-फितरचा शहरात उत्साह होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत, पहिल्यांदाच घरातच ईद-उल-फितरची विशेष नमाज अदा केली.
ठळक मुद्देघरातच केले नमाज पठण : देश आणि कोरोना योद्ध्यांसाठी मागितली दुवा