शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

आठवा मृतदेहही मिळाला

By admin | Published: July 12, 2017 2:44 AM

पिकनिकला गेलेल्या १० पैकी आठ तरुण वेणा जलाशयात बुडाल्याची घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी घडली.

 कळमेश्वर : पिकनिकला गेलेल्या १० पैकी आठ तरुण वेणा जलाशयात बुडाल्याची घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी घडली. यातील एकाचा मृतदेह रविवारी रात्री आणि सहा जणांचे मृतदेह सोमवारी बचाव पथकाने पाण्याबाहेर काढले. उर्वरित एका तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि. ११) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यात आला. अतुल भोयर, रा. हुडकेश्वर, नागपूर असे या मृत तरुणाचे नाव आहे. मृतांमध्ये अतुल व्यतिरिक्त राहुल जाधव, रा. नवीन सुभेदार, नागपूर, अंकित अरुण भोस्कर (२२, रा. हिंगणा), परेश काटोके, रा. नागपूर, रोशन खांदारे, रा. पेठ (कालडोंगरी), अक्षय मोहन खांदारे, रा. पेठ (कालडोंगरी), अतुल भोयर, रा. हुडकेश्वर, नागपूर, पंकज डोईफोडे, रा. उदयनगर, नागपूर व प्रतीक आमडे, रा. उदयनगर, नागपूर या आठ जणांचा समावेश आहे. अमोल मुरलीधर दोडके (२८, रा. दत्तात्रयनगर, नागपूर), रोशन मुरलीधर दोडके, रा. दत्तात्रयनगर, नागपूर व नावाडी अतुल ज्ञानेश्वर बावणे (२१, रा. पेठ कालडोंगरी) हे तिघे बचावले. दरम्यान, बचाव पथकाने राहुलचा मृतदेह रविवारी रात्री तर अंकित, परेश, रोशन, अक्षय, प्रतीक व पंकज यांचे मृतदेह सोमवारी पाण्याबाहेर काढले. सोमवारी रात्रीपर्यंत अतुलला शोधण्याचे कार्य सुरूच होते. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यातच बचाव पथकाला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अतुलचा मृतदेह जलाशयातील पंप हाऊसजवळ तरंगताना आढळून आला. मृतदेह पाण्याबाहेर काढत कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तिथे उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. जलाशयात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड)च्या नागपूर येथील पथकासोबतच जगदीश खरे यांचीही मदत घेण्यात आली.