लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेळता खेळता सात वर्षीय मुलाने खिळा गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून ग्रामस्थांनी त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले. मात्र, खिळा बाहेर येण्याऐवजी मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन फसला. अशीच वेळ तीन वर्षांच्या चिमुकलीवर ओढवली. घरात पडलेला संगणकाचा सेल तिने गिळला. तोही अन्ननलिकेजवळ फसल्याने ती चिमुकलीही अत्यवस्थ झाली. या दोन्ही घटनेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात विना शस्त्रक्रियेने या दोन्ही वस्तू बाहेर काढल्या. दोन्ही चिमुकल्यांना जीवदान मिळाले.हिमांशु शैलेश क्षीरसागर (७ वर्षे) आणि परी रामदास भोंडे (३ वर्षे) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातल्या बोपेसर येथे वास्तव्य करणारे शैलेश क्षीरसागर हे केशकर्तनालय चालवतात. त्यांचा सात वर्षांच्या मुलगा हिमांशुने गुरुवारी खिळा गिळला. त्याला तत्काळ मेडिकलमध्ये आणले. अपघात विभागातून त्याला ‘सुपर’मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. येथे काढण्यात आलेल्या ‘एक्स-रे’मध्ये पोटात खिळा असल्याचे निदान झाले. हिमांशुच्या पोटात फसलेला खिळा ‘ड्युडनल थर्ड पार्ट’ म्हणजे जिथून छोट्या आतड्यांना सुरुवात होते, तिथे फसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. खिळा अणकुचीदार असल्याने तो बाहेर काढताना आतड्याना इाजा होण्याची जोखीम होती. त्यामुळे प्रथम त्याच्या आतड्यात फसलेला खिळा पोटापर्यंत आणणे आवश्यक होते. ही बाब हेरून डॉ. सुधीर गुप्ता यांनी शनिवारी उपचार करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी डॉक्टरांच्या बºयाच प्रयत्नानंतर ‘डबल बलून एन्डोस्कोप’च्या मदतीने चार इंचाचा खिळा कुठलीही दुखापत न करता बाहेर काढला. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अमोल समर्थ, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. केतकी रामटेके, डॉ. तुषार संकलेचा, डॉ. हरीश कोठारी, सोनेल गट्टेवार, सायमन माडेवार, विकास अंबुलकर, रेखा केणे यांनी सहकार्य केले.अत्याधुनिक दुर्बिणीचा वापर - डॉ. सुधीर गुप्ताया दोन्ही शस्त्रक्रिया साध्या दुर्बिणीद्वारे शक्य नव्हत्या. त्यासाठी ‘डबल बलून इंडोस्कोपी’चा आधार घेण्यात आला. ही दुर्बिण अत्यंत अचूकतेने काम करते. पंतप्रधान आरोग्य योजने अंतर्गत मिळालेल्या या वैद्यकीय उपकरणामुळे यापूर्वी देखील अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरिबांना अत्यंत माफक दरात ही उपचार पद्धती शक्य झाली आहे. अशी माहिती डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली.अन्ननलिकेच्या मुखाजवळ फसला सेलमोर्शी येथील रामदास भोंडे यांची तीन वर्षाची मुलगी परीने देखील १५ दिवसांपूर्वी खेळता खेळता संगणकाचा सेल गिळला. आपण एक रुपया खाल्ल्याचे तिने वडिलांना सांगितले. रामदास यांनी प्रथम तिला अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला ‘सुपर’मध्ये रेफर करण्यात आले. गेल्या आठवड्यात परीच्या अन्ननलिकेच्या मुखाजवळ फसलेला सेलही अशाच पद्धतीने बाहेर काढण्यात आला.
एकाने गिळला खिळा, दुसरीने सेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:46 AM
खेळता खेळता सात वर्षीय मुलाने खिळा गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून ग्रामस्थांनी त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले.
ठळक मुद्दे‘सुपर’मध्ये शस्त्रक्रिया : डॉक्टरांच्या कौशल्यामुळे दोघांना जीवनदान