लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसंपासून दिवसरात्र राबत आहेत. तीन दिवसांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच २४ तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष.निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. तेव्हापासून निवडणूक विभागाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. परंतु मंगळवारपासून निवडणूक विभागाची धावपळ वाढली. साहित्य वाटपाच्या दिवसापासून जागरण सुरु झाले. मतदानाचा दिवस तर सर्वात महत्त्वाचा ठरला. नागपूर लोकसभेतील २०१६ आणि रामटेक येथील २३६४ असे एकूण ४४२९ मतदान केंद्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन सील करून ते आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. येथे प्रत्येक ईव्हीएमची मोजणी झाली. किती बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट नेण्यात आले, त्या प्रत्येकाची मोजणी झाली. किती खराब झाले. त्या परत आलेत का? या सगळ्यांची बूथनिहाय मोजणी केली. त्यानंतर प्रत्येक मशीन विधानसभानिहाय कंटेनरमध्ये सीआयपीएफच्या सुरक्षेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले. यासंपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांपासून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचे जागरण होत आहेच. परंतु निवडणूक विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारीही रात्रभर जागत आहेत. निवडणूक विभागातील गुरुवारी कामावर आलेले अनेक अधिकारी तर आज शुक्रवारी दुपारपर्यंत कार्यालयातच होते, हे विशेष.आमचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने राबत आहे. त्यांची झोप झालेली नाही. मतदानाचे साहित्य वाटपापासून तर त्यांच्यावर कामाचा अधिकच ताण आहे. आज थोडे कामापासून मोकळे झाले. त्यांनी पुरेशी झोप घेण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना सवलत दिली जाईल.अश्विन मुदगलजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, तथा जिल्हाधिकारी३८ ठिकाणी सुरु होते ६ नंतरही मतदाननिवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु ६ वाजता मतदान केंद्रावर रांगेत असलेली शेवटची व्यक्ती मतदान करेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार होती. त्यानुसार नागपूर शहरात एकूण ३८ ठिकाणी सायंकाळी ६ नंतरही लोकं रांगेत होते. त्यांची एकूण मतदानाची प्रक्रिया ७ ते ७.३० पर्यंत चालली.विधानसभानिहाय ६ नंतर सुरु असलेले मतदान केंद्रविधानसभा मतदान केंद्रउत्तर नागपूर १३पूर्व नागपूर ४मध्य नागपूर ३दक्षिण नागपूर ९पश्चिम नागपूर ४दक्षिण-पश्चिम नागपूर - ५----------------------------एकूण ३८