गडकरी, तुमानेंविरुद्ध निवडणूक याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:18 PM2019-07-05T23:18:46+5:302019-07-05T23:20:24+5:30

भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध तर, गजभिये यांनी तुमाने यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे.

Election Petition against Gadkari, Tumane | गडकरी, तुमानेंविरुद्ध निवडणूक याचिका

गडकरी, तुमानेंविरुद्ध निवडणूक याचिका

Next
ठळक मुद्देनाना पटोले व किशोर गजभिये यांच्या याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध तर, गजभिये यांनी तुमाने यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूर मतदारसंघातून गडकरी यांनी पटोले यांचा तर, रामटेक मतदारसंघातून तुमाने यांनी गजभिये यांचा पराभव केला. दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही मतदारसंघाची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी व या ठिकाणी नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे व अ‍ॅड. वैभव जगताप कामकाज पाहतील.

 

Web Title: Election Petition against Gadkari, Tumane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.