युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवडणूक चुरशीची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:00 AM2018-09-15T02:00:58+5:302018-09-15T02:01:10+5:30
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे हे विजयी झाले, तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्षपदी निवडून आले.
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे हे विजयी झाले, तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्षपदी निवडून आले. यासोबतच ११ महासचिव व ४८ सचिवांच्या पदांसाठी झालेल्या निवडणूकीचीदेखील शुक्रवारी मतगणना झाली. महासचिव व सचिवपदासाठी अनेक उमेदवारांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. अगदी निसटत्या मतांनी काही जणांची विजयाची संधी हुकली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर येथील देवडिया भवनात शुक्रवारी मतमोजणी पार पडली. तरुण त्यागी यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी प्रदेश निवडणूक अधिकारी सज्जाद तारीक व सुधीर चौधरी यांनी निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सांभाळली. युवक कॉंग्रेसकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत निकाल घोषित करण्यात येणार होते. मात्र रात्री उशीरापर्यंत अधिकृत घोषणा झाली नाही. उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून महासचिव व सचिवपदाच्या उमेदवारांची नावे समोर आली आहेत. आम्ही सविस्तर निकाल शनिवारी आमच्या ‘आयवायसी.इन’ या संकेतस्थळावर जाहीर करू, अशी माहिती निवडणूक प्रक्रियेचे जनसंपर्क अधिकारी सुधीर चौधरी यांनी दिली.
नवनियुक्त पदाधिकारी अध्यक्ष : सत्यजित तांबे, उपाध्यक्ष : अमित झनक, कुणाल राऊत, मसरुर खान, नागसेन भेर्जे महासचिव : आदित्य सावळेकर, आमीर अब्दुल सलिम, आदित्य पाटील, ब्रिजकिशोर दत्त, अनिकेत म्हात्रे, करण ससाने, श्रीनिवास नलमवार
सचिव : अभय देशमुख, अभिजित अवचार, अभिषेक भार्गड, अजयकुमार इंगवले, अजिंक्य भोईर, अजित सिंग, अकिल पटेल, अलोक पवार, अमरिश भोई, आशिष गिरी, अतुल वाघ, भास्कर गुंजाल, भूषण मरसकोल्हे, दिग्विजय दळवी, फिरोज शाह, गणेश जगताप, इद्रीस नवाब खान, इंद्रजित साळुंके, जयदीप शिंदे, महानिंगप्पी महाशेट्टी, मिलिंद चिट्टे, मो.कादर शेख, नीलेश काटे, नीलेश खोब्रागडे, नितीन पाटील, पंकज जगताप, प्रभाकर मुत्थे, पुनित पाटील, राजीव पाटील, रोहित खैरवार, रुचित दवे, रुपेश जैस्वाल, सचिन कट्याल, सचिन पाटील,
सागर देशमुख, सागर कावरे, सलाम अब्दुल, समीर जवंजाळ, शंभुराजे देसाई, श्रेयस इंगोले, तनवीर अहमद सिद्दीकी, उमेश ठाकूर, विकी बघेले, विजयसिंग मोरे, विक्रम ठाकरे, विनोद भोसले,
महेश ढगे.