शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक निकाल 2019: अशी चालेल मतमोजणीची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 9:16 PM

पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु केली जाईल. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.

ठळक मुद्देसकाळी ८ वाजता सुरू होणार मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेकनागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु केली जाईल. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.

मतमोजणी केंद्रापासून ४०० मीटर अंतरावर स्ट्राँग रुम बनविण्यात आली आहे. यात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या आहेत. सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि नंतर स्थानिक पोलिसांची सुरक्षा आहे. दोन्ही लोकसभेच्या जागेसाठी दोन वेगवेगळ्या स्ट्राँग रुम आहेत. स्ट्राँग रुमचे शटर कुलूप लावून सील केले असून, त्याच्यासमोर विटा-सिमेंटची भिंत बनविण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर भिंत तोडून सील काढून ईव्हीएम काढल्या जातील. 
विधानसभानिहाय मतमोजणी होईल. १०-१० असे एकूण २० टेबल राहतील. प्रत्येक लाईनची जबाबदारी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार स्तराच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तो त्या लाईनचा ‘रो ऑफिसर’ राहील. तो मतांची मोजणी करण्यासाठी टेबलवर बसलेल्या कर्मचाऱ्यास ईव्हीएम मशीन देईल तसेच मोजणी झाल्यावर ती सील करून ठेवण्याची जबाबदारीही त्याची राहील. ईव्हीएममध्ये रिझल्ट बटन दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मत डिस्प्ले होतील. एका उमेदवाराचे मत ७ सेकंदपर्यंत दिसून येतील. अशा परिस्थितीत नागपूरच्या ३० उमेदवारांसह एक नोटा असे एकूण ३१ पर्याय आहेत. त्याप्रकारे एका ईव्हीएममध्ये उमेदवारांच्या मतांचा डिस्प्ले २१० सेकंदपर्यंत राहील. ही मते मॅन्युअल आणि कॉम्प्युटरने मोजले जातील. प्रत्येक फेरीनंतर एआरओ या दोघांची तपासणी करतील. यानंतर ते ऑब्झर्व्हरकडे पाठवले जातील. त्यांनी पाहिल्यानंतरच आकडे जारी केले जातील. प्रत्येक फेरीत असे होईल. सर्वात शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी सर्व उमेदवारांना मिळालेली एकूण मते जाहीर करून विजयी उमेदवाराची घोषणा करतील तसेच विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करतील.८८८ कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभागमतमोजणीसाठी प्रत्यक्षात ८८८ कर्मचारी सहभागी होतील. यामध्ये नागपूर लोकसभेसाठी ४४४ आणि रामटेकसाठी ४४४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या वाहनातून येतील ईव्हीएमईव्हीएमच्या वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. रामटेक आणि नागपूर या दोन्ही लोकसभेच्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममधून सहा-सहा वाहनांमधून आणल्या जातील. यासाठी केवळ मारुती ओम्नी या गाड्याच वापरल्या जातील. त्यांचा रंगही ठराविक राहील. एका लोकसभेच्या ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या गाडीचा रंग पिवळा तर दुसऱ्या वाहनाचा रंग पांढरा राहील. नागपूरच्या ईव्हीएम घेऊन येणारे वाहन हे रस्त्याच्या उजव्या बाजूने तर रामटेकच्या डाव्या बाजूने आणल्या जातील. ही पूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केली जाईल. या कॅमेऱ्यांचा डिस्प्ले मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या खुर्चीजवळ राहील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक