शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 8:30 PM

राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील १९२ गावांतील सुमारे ८८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून यात विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या देऊन निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे. महावितरणकडून विदर्भातील ११ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली होती.

ठळक मुद्देग्राम स्वराज्य अभियान : विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील १९२ गावांतील सुमारे ८८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून यात विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या देऊन निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे. महावितरणकडून विदर्भातील ११ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली होती.केंद्र्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या २३ जिल्ह्यांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे २०१८ रोजीच पूर्ण केले असून या १९२ गावातील ८८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वात प्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे. विदर्भातील अकोला ४१०, अमरावती ७३५, भंडारा २४४, बुलढाणा ५६५, चंद्रपूर ७४४, गडचिरोली १०९२, गोंदिया ५९, नागपूर १०७, वर्धा ५, वाशीम ४२६ यवतमाळ ७८८ इतक्या वीज जोडण्या देण्यात आल्या.महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रमामुळे राज्यातील ८८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात दुर्गम व संवेदनशील अशा गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्र्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्ह्यातही वीजजोडणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण