लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज देयकांच्या थकबाकीची वाढती रक्कम ही महावितरणसाठी डोकेदुखी बनली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत नागपूर विभागातील ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम ही तब्बल ७ हजार कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महावितरणकडे विचारणा केली होती. नागपूर विभागात किती विजेची मागणी होती, वर्षभरात किती विजेचा पुरवठा झाला, वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा किती व १० लाखांहून अधिक थकबाकी किती ग्राहकांकडे आहे, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. नागपूर मंडळात अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर शहर व नागपूर ग्रामीण मंडळाचा समावेश होतो. महावितरणकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१९-२० या आर्थिक वर्षात नागपूर विभागात ६ हजार ५२४ कोटी १५ लाख रुपयांच्या विजेची मागणी होती. ९३३ कोटी ५७ लाख ५७ हजार ६३६ युनिट विजेचा पुरवठा करण्यात आला. या कालावधीत ३१ लाख ४३ हजार ३५८ ग्राहकांकडे थकबाकी होती. थकबाकीची एकूण रक्कम ही ७,९३० कोटी ४० लाख ३० हजार ८६६ इतकी होती.दरम्यान, १० लाख किंवा त्याहून अधिक थकबाकी असलेले नागपूर विभागातील ग्राहकांची संख्या २८ इतकी होती. या ग्राहकांकडे जानेवारी महिन्यात व्याजासह ४ कोटी ९१ लाख ३६ हजार ४८० रुपयांची थकबाकी होती.वर्ष थकबाकीदार ग्राहक थकबाकी२०१५-१६ २१,५८,०५९ ३८,४२,८५,७७,१७२२०१६-१७ २२,९२,५८९ ४७,८४,८८,५६,११७२०१७-१८ २३,१९,७२१ ५८,४६,७७,२६,३५७२०१८-१९ २६,५६,४१८ ७१,१८,८४,४८,६५९२०१९-२० ३१,४३,३५८ ७९,३०,४०,३०,८६६
वीज ग्राहकांकडे तब्बल ७ हजार कोटींहून अधिकची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 9:16 PM
वीज देयकांच्या थकबाकीची वाढती रक्कम ही महावितरणसाठी डोकेदुखी बनली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत नागपूर विभागातील ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम ही तब्बल ७ हजार कोटींहून अधिक होती.
ठळक मुद्देनागपूर विभागातील वास्तव : माहिती अधिकारातून खुलासा