शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीजजोडणी

By admin | Published: May 02, 2017 1:39 AM

शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये शेतीला सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषीपंपाना वीज कनेक्शन देण्यात येणार आहे.

चंद्र्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन उत्साहातनागपूर : शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये शेतीला सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषीपंपाना वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. राज्यात शेतीपंप सौर ऊर्जेवर आणून दिवसभर शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७ वा वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर सशस्त्र पोलीस दलाच्या पथसंचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासोबतच विदर्भ व मराठवाड्यातील शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंतप्रधान सिंचन योजनेमधून २६ हजार कोटी रुपये सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासोबतच उन्नत शेती, समृध्द शेतकरी या अभियानामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच शेतीसंदर्भातील सर्व योजना आॅनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. नागपूर शहर हे शैक्षणिक हब म्हणून विकसित होत असतानाच येथील नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अमृत योजनेसह विविध योजनाअंतर्गत महानगरपालिकेला २९६ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरासोबतच ग्रामीण परिसराच्या विकासासाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची लवकरच स्थापना करण्यात येत असून शहरासोबतच ग्रामीण भागाचाही नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. मेट्रो, तसेच ताजबाग, दीक्षाभूमी, कोराडी मंदिर देवस्थान, चिचोली, ड्रॅगन पॅलेस आदी स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये यापूर्वी केवळ २०० ते २५० कोटी रुपयाचे वार्षिक नियोजन होत होते. परंतु यावर्षी हा निधी ५९७ कोटी रुपयापर्यंत वाढविण्यात आला असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, माजी आमदार यादवराव देवगडे, डॉ. राजीव पोतदार, तसेच विविध लोकप्रतिनिधी, माजी स्वातंत्र्य सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)महिला पोलिसांची सुरक्षा व्यवस्थामहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या कस्तूरचंद पार्क येथे आयोजित मुख्य कार्यक्रम सोहळ्याला महिला पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली.कृषी विभागाची मोबाईल अ‍ॅप एसएमएस सेवा सुरू१८००४१९८८०० टोल फ्री क्रमांकपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व रिलायन्स फाऊंडेशनच्या मोबाईल व मोफत ध्वनिसंदेशाच्या माध्यमातून कृषी, हवामान, शासकीय योजनांची माहिती मोफत देणाऱ्या एसएमएस व ध्वनिसंदेश सेवेची सुरुवात करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व रिलायन्स फाऊंडेशच्या वतीने कृषीविषयक, पशुसंवर्धन, हवामान तसेच शासकीय कृषी योजनाविषयी माहिती व संदेश सेवा पुरविण्यात येत आहे. सदर सेवेचा सर्व शेतकरी बंधूनी लाभ घ्यावा, तसेच इतर शेतकऱ्यांनासुद्धा या सेवाचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या १८००४१९८८०० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कुर्वे यांच्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार यावेळी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जलयुक्त शिवार उपक्रमात नागपूर विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासह १५ वर्षांच्या उत्तम कामगिरीबद्दल ३५ विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याशिवाय क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार सचिन घोडे, आचल मेश्राम तर विहीरगाव येथील आनंद बहुद्देशीय युवा सामाजिक संस्थेला प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायतीमध्ये महालगावच्या सरपंच दीपाली चणेकर, वागदऱ्याच्या कल्पना फुंडकर, खापरीचे दिनेश पडोळकर, दिगलगोंदी ज्योत्स्ना मरकाम, धानल्याच्या ज्योती सावरकर, उमरेड तालुक्यातील माया गुरनुले, सीतापूरच्या जयमाला साखरकर आणि दहेगाव जोशीचे सरपंच रितेश भोयर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या ३० वर्षांपासून नागपूर येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे उत्कृष्ट समालोचक सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.