शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 1:50 AM

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरण्यास अडचण होत असल्याची बाब महावितरणकडून जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करून देण्यात आली होती. किमान ग्रामीण भागात वीज ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथील वीज देयक केंद्र सुरू करण्यासाठी महावितरणने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मे २०२० पासून केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्देशित केलेल्या मानकांचे पालन करून वीज देयक भरणा केंद्र सुरू करण्याची रीतसर परवानगी दिली आहे. यानुसार येथे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वीज ग्राहक आपल्या वीज देयकाची रक्कम भरू शकतील.महावितरणकडून सध्या छापील देयकाची प्रत वितरित करणे बंद केले आहे. यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर आलेला एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून देयकाची रक्कम भरण्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून केंद्र सुरु करावे. वीज देयक भरणा केंद्रावर सोशल डिस्टन्सचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी तसेच स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी महावितरणकडून दिल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या वीज ग्राहकांनी सुरू असलेल्या वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन थकबाकी असलेल्या देयकाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल