लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राहक प्रतिनिधींनी यापुढे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ग्राहक प्रतिनिधी म्हणून येताना संबंधित ग्राहकासमवेत उपस्थित राहावे, अन्यथा त्यांची तक्रार सुनावणीस घेतली जाणार नाही, त्यांच्याकडून अशा चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, अशी ताकीद देत विद्युत लोकपाल, नागपूर यांनी एका वीज ग्राहक प्रतिनिधीची तक्रार फेटाळून लावली.कुंद (शेगाव) तालुका समुद्र्रपूर, जिल्हा वर्धा येथील प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांना त्यांच्या शेतात ३ अश्वशक्तीच्या कृषिपंपाला वीजपुरवठा मिळाला नसल्याची तक्रार प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांच्यावतीने ग्राहक प्रतिनिधी बी.व्ही. बेताल यांनी विद्युत लोकपाल, नागपूर यांच्याकडे दाखल केली होती. वीज जोडणी न मिळाल्याने झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईपोटी ७ लाख रुपये तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी १५ हजार व ५ हजार प्रवासभाडे अणि संबंधितावर २५ हजाराचा दंड अशी एकूण ७ लाख ४५ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही या तक्रारीत करण्यात आली होती.याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान महावितरणच्या हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत प्रल्हाद पावडे यांनी प्रतिवादी म्हणून बाजू मांडताना भक्कम पुराव्यासह सिद्ध केले की, प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांनी कधीही कृषिपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केलेला नसून त्यांचे वडील धोंडबा लक्ष्मण वाघीडे यांनी महावितरणकडे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेला आहे. याशिवाय प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांनी २४ जून २०१९ रोजी लोकपाल कार्यालय, नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात केली असताना धोंडबा लक्ष्मण वाघीडे यांना त्यांच्या नवीन वीजजोडणीच्या अर्जानुसार ६ जून २०१९ रोजीच उच्च दाब वितरण यंत्रणेत नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. प्रतिवादींनी लोकपाल यांच्यापुढे सादर केलेली ही सर्व माहिती योग्य असल्याची कबुली तक्रारदार प्रकाश धोंडबाजी वाघीडे यांनी मान्य केली. तेव्हा ग्राहक प्रतिनिधी बेताल यांनी तक्रारकर्त्याने आपल्यापासून सत्य लपवून ठेवल्याचे मान्य करीत लोकपाल यांची बिनशर्त माफी मागितली.याप्रकरणी आपल्या निकालपत्रात लोकपाल यांनी सदर तक्रार फेटाळून लावत ग्राहक प्रतिनिधी बेताल यांची कानउघाडणी केली. बेताल यांनी दाखल केलेल्या अनेक तक्रारी या विषयाशी विसंगत असतात. त्यांच्या या कृतीमुळे कार्यकारी अभियंता, हिंगणघाट यांचा मूल्यवान वेळ निरर्थक वाया गेला. सोबतच अर्जदार प्रकाश वाघीडे यांनाही अनेक अडचणींसोबतच तक्रारीपोटी आर्थिक भुर्दंडही बसला असल्याने बेताल यांनी भविष्यात यापुढे ते ग्राहक प्रतिनिधी असलेल्या प्रकरणात ग्राहकासमवेत उपस्थित राहावे अन्यथा त्यांची तक्रार सुनावणीस घेतली जाणार नाही. त्यांच्याकडून अशा चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, अशी स्पष्ट समज विद्युत लोकपाल, नागपूर यांनी विद्युत ग्राहकाला दिली आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि उपविधी अधिकारी डॉ. संदीप केणे यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी महावितरणची बाजू भक्कमपणे मांडत स्वयंघोषित ग्राहक प्रतिनिधीचा व्यावसायिक स्वार्थ उधळून लावला.
वीजग्राहक प्रतिनिधींनी ग्राहकांसमवेत उपस्थित राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:24 AM
ग्राहक प्रतिनिधींनी यापुढे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ग्राहक प्रतिनिधी म्हणून येताना संबंधित ग्राहकासमवेत उपस्थित राहावे, अन्यथा त्यांची तक्रार सुनावणीस घेतली जाणार नाही, त्यांच्याकडून अशा चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, अशी ताकीद देत विद्युत लोकपाल, नागपूर यांनी एका वीज ग्राहक प्रतिनिधीची तक्रार फेटाळून लावली.
ठळक मुद्देविद्युत लोकपालांची ताकीद : तक्रार फेटाळून लावली