लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या पाचही जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना भविष्यातही पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता यावा म्हणून कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी २२०/३३ आणि १३२ केव्हीचे उपकेंद्र उभारण्यास महापारेषणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पारेषणच्या २०१७-१८ ते २०२२-२३ या पाच वर्षाच्या विकास आराखड्यात या उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या पाचही उपकेंद्रांची कामे सुरु होणार आहेत. पूर्व विदर्भातील शेतकरी, औद्योगिक ग्राहकांना आजही योग्य दाबाने वीजपुरवठा होत असतानाच भविष्यातही कमी दाबाने वीजपुरवठा होऊ नये म्हणून हे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. परिणामी पूर्व विदर्भाच्या पारेषण क्षमतेत वाढ होईल. कोलारी येथे १३२/३३ क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. येथील भंडारा, मोखेबर्डी वाहिनीला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच १३२ केव्ही लिंकलाईन नागभीडपर्यंत नेण्यात येणार आहे. यातून चिमूर तालुक्यातील भुयार आणि मोखेबर्डी या चंद्रपूर जिल्ह्यातील भागाला लाभ होणार आहे.नवीन पाच उपकेंद्रे हे नागपूर जिल्ह्यात असली तरी या उपकेंद्रातून पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही तालुक्यांना वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. नागभीड कोलारीवरून चिमूरला वीजपुरवठा होणार आहे. गडचिरोलीतील चामोर्शी भागातील ग्रामीण भागाला वीजपुरवठा होईल. यामुळे आदिवासी भागाला सक्षम आणि योग्य दाबाने वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
पूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:22 PM
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या पाचही जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना भविष्यातही पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता यावा म्हणून कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी २२०/३३ आणि १३२ केव्हीचे उपकेंद्र उभारण्यास महापारेषणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
ठळक मुद्दे पारेषणच्या पाच उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता