नागपूर : राज्यातील वीज दरवाढीचा बोजा सहन करत असलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यंदा एप्रिल महिन्यात विजेमध्ये दरवाढ होणार नाही, तर हे दर थोडे घटणार आहेत. राज्याच्या वीज नियामक आयोगाकडून मंजूर झालेल्या मल्टी इअर टेरिफनुसार घरगुती विजेच्या दरात सर्वच श्रेणींमध्ये घट होणार आहे. महावितरणनेसुद्धा या दरांना आव्हान दिलेले नाही. यावरून १ एप्रिलपासून दर घटण्याचे संकेत आहेत.
राज्याच्या वीज नियामक आयोगाने ३१ मार्च २०२० ला १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या मल्टी इअर टेरिफला मंजुरी दिली आहे. यातील २०२०-२१ या पहिल्या वर्षात दरामध्ये वाढ करण्यात आली. स्थिर आकार २२ टक्के वाढविल्याने वीज महागली. मात्र, २०२१-२२ या दुसऱ्या वर्षात हे दर घटले आहेत. साधारणत: मागील दोन ते तीन दशकात प्रथमच दर कमी होत आहेत.
...
स्थिर आकार वाढणार
स्थिर आकार वाढणार असूनही विजेच्या नव्या दरांमध्ये वाढ होणार नाही. आयोगाच्या निर्देशानुसार, २०२०-२१ मध्ये प्रत्येक श्रेणीसाठी स्थिर आकार ११० रुपयांवरून ११२ रुपये केला जाईल. या प्रकारे व्यावसायिक वीज वापरकर्त्यांकडून घेतला जाणारा हा दर ४०३ रुपयांऐवजी ४१५ रुपये आकारला जाईल. सध्यातरी घरगुती थ्री फेज कनेक्शनसाठी ३५० रुपयांचा दर कायम ठेवला आहे.
...
२,३७७ रुपयांचे बिल होणार २,३३८ रुपयांचे
‘लोकमत’ने नव्या दरांचा परिणाम समजून घेण्यासाठी भविष्यात येणाऱ्या बिलांच्या परिणामाचे विश्लेषण केले. ३०० युनिटच्या उपयोगासाठी २,३७७ ऐवजी २,३३८ रुपये द्यावे लागतील. याच प्रकारे ३० युनिटसाठी २५७.३० रुपयांऐवजी २५६.६० रुपये, १०० युनिटकरिता ६०१ रुपयांऐवजी ५९४ रुपये, तर एक हजार युनिटसाठी ११,३११ रुपयांऐवजी आता ११,२८६ रुपये द्यावे लागतील.
...
असे असतील घरगुती बिलांचे दर
श्रेणी : २०२०-२१ : २०२१-२२ : फरक
०-१०० : ४.९१ रु : ४.८२ रु. : ९ पैसे कमी
१०१-३०० : ८.८८ रु : ८.७२ रु. : १६ पैसे कमी
३०१-५०० : ११.७७ रु. : ११.७४ रु. : ३ पैसे कमी
५०१-१००० : १३.१६ रु. : १३.२० रु. : ४ पैसे कमी
१००० वर : १३.१६ रु. : १३.२० रु. : ४ पैसे कमी
टिप : स्थिर आकार ११० रुपये घेतले जातील.