पीडित उतरले रस्त्यावर : तोंडावर काळी पट्टी बांधून निदर्शनेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात अवैध लेआऊट आणि नागरिकांच्या प्लॉटवर बळजबरीने ताबा मिळविल्याच्या विरोधात भूमाफिया पीडित जन आंदोलनाच्या वतीने आयोजित आंदोलनात जवळपास ३०० पीडितांनी व्हेरायटी चौकात तोंडावर काळी पट्टी बांधुन निदर्शने करून भूमाफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. भूमाफियांविरोधात निदर्शने करून आंदोलनकर्त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे आंदोलनकर्त्यांनी भूमाफियांनी आदिवासी, झोपडपट्टी, जनहितासाठी आरक्षित जमिनी, भूदानच्या जमिनीवर ताबा घेतल्याचे नमूद केले. त्यानंतर त्या जागेचा प्लॉट असल्याचे दाखवून ते गरजू लोकांना विकले. जमिनीचा मूळ मालक आणि खरेदीदारांना ही बाब माहीत झाल्यास भूमाफिया त्यांना धमकी देतात. नियमानुसार सहकारी हाऊसिंग सोसायटी तयार करून प्लॉटची विक्री होणे गरजेचे आहे. भूमाफिया स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे प्लॉटही रेसिडेन्सियल सांगून विकत आहेत. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात दिलीप नरवडिया, नरेश निमजे, राहुल छाबरा, वासुदेव चौधरी, मुकुंद घाटे, रवींद्र विसाद, दिनेश लांडे, ज्ञानेश्वर गुरव, अरुण नायडू, सुनील खंडेलवाल, अजय कुमार, जीवन कोलते, ललित चौरिया आदी उपस्थित होते.मासिक किश्तीचे प्रलोभनपीडितांनी सांगितले की, अनेक भूमाफिया मासिक किश्तीवर प्लॉट उपलब्ध असल्याचे प्रलोभन देत आहेत. प्लॉटची पूर्ण रक्कम दिल्यानंतर रजिस्ट्री मिळत नाही. शासकीय कार्यालयाच्या चकरा मारल्यानंतरही त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर दबाव टाकल्यास ते धमकी देण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशी अनेक प्रकरणे शहरात दाखल आहेत. परंतु त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे भूमाफिया बिनधास्तपणे जमिनीचे व्यवहार करीत आहेत.दर महिन्यात घ्यावा जनता दरबारपीडितांनी महिन्यातून एकवेळा जनता दरबार घेऊन भूमाफियांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करून स्थायी रूपाने काम केल्यास असे प्रकरण घडणार नाहीत. दरम्यान, पीडितांनी ग्वालबन्सी प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांचे आभार मानले.
भूमाफियांविरोधात एल्गार
By admin | Published: May 16, 2017 2:24 AM