नागपूर - युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या नेतृत्वात रविवारी येथे बेरोजगारीच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी तरुणांनी एल्गार मोर्चा काढला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून यशवंत स्डेडियमवर मोर्चा नेण्यात आला.मोर्चात अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे, अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके आदींसह तरुण व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले.मोदी व गडकरी यांनी युवकांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न दाखविले. चार वर्षे निघून गेली तरी स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. सरकारने किती नोकºया दिल्या याचा हिशेब सादर करण्याची मागणी नितीन राऊत यांनी केली. अविनाश पांडे म्हणाले, पालकांनी कर्ज काढून मुलांच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च केले आहेत. मुलाला नोकरी लागली की कर्ज फेडू, अशी आई-वडिलांना आशा होती. मात्र, चार वर्षात केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. नाना पटोले यांनी युवकांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. अनिस अहमद यांनी बेरोजगारी वाढण्यासाठी सरकारची धोरणे जबाबदार असल्याची टीका केली. राजेंद्र मुळक यांनी नोकºयाच द्यायच्या नसतील तर एवढा खर्च युवकांनी कशासाठी केला, असा सवाल केला़
बेरोजगार युवकांचा नागपूरमध्ये एल्गार, काँग्रेसच्या नेतृत्वात उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:49 AM