मनपाच्या प्रवर्तन विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने सोमवारी शहराच्या विविध भागांत अतिक्रमण विरोधात मोहीम राबवून १०४ अतिक्रमणांचा सफाया केला.
लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने माटे चौक ते प्रतापनगर चौक दरम्यानच्या रोडवरील चहा टपऱ्या, फळ व भाजीविक्रेत्यांची दुकाने हटविली. तसेच माटे चौक ते आयटी पार्क, अंबाझरीरोड ते मंगलमूर्ती चौक ते जयताळा बाजार चौक दरम्यानच्या मार्गावरील ३८ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त के ले.
हनुमानगर झोनच्या पथकाने मानेवाडा चौक ते उदयनार चौक ते सुभेदार ले-आउट, तुकडोजी पुतळा चौक आदी भागांतील फुटपाथवरील २६ अतिक्रमणाचा सफाया केला.
धंतोली झोनच्या पथकाने रामेश्वरी येथे दर आठवड्याला भरणारा बाजार हटविला. परिसरातील १८ अतिक्रमण हटविले. आशीनगर झोनच्या पथकाने कमाल चौक ते इंदोरा चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन या रस्त्याच्या दोन्ही बाजूची २२ अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे केले.