लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसहाय्य करणार आहे. याबाबत जिका आणि महापालिकेत करार करण्यात आला आहे.त्यानुसार प्रकल्प नियोजनाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिका नियुक्त केलेल्या कन्स्लटंटचे शिष्टमंडळ नागपुरात आले आहे. बुधवारी आयुक्त सभागृहात आयोजित बैठकीत शिष्टमंडळाने महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.यावेळी आयुक्त अभिजीत बांगर, अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडनीस, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, मो. शफीक, एनजेएसचे प्रकल्प सल्लागार विद्याधन सोनटक्के, डॉ. प्रणीता उमरेडकर, संदीप लोखंडे, प्रकल्पासाठी जिकाने नियुक्त केलेल्या निप्पॉन कोई इंजिनिअरिंग कन्स्लटंटचे ताकामासा निशिकावा, केईसुके ओ काझाकी, युईच रो कोन्नो,तायसुके वॉटनबे आदी उपस्थित होते.नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हा नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करिता जिकाचे तांत्रिक सल्लागार प्रकल्पाची चाचणी करून चार महिने काम करणार आहेत. याबाबत मनपा प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे अधिकारी जिका चमूला आवश्यक तांत्रिक सहकार्य करणार असल्याचे अभिजीत बांगर यांनी चर्चेदरम्यान सांगतिले.प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा अहवाल जपान सरकाला जिका सादर करणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर केंद्र शासन व जपान सरकार यांच्यामध्ये याबाबत करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रकल्प मोठा असल्यामुळे यास कॅबिनेट काउंसिलची मान्यता घ्यावी लोगल, असे तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी यावेळी सांगतिले.
नागनदी प्रदूषण निर्मूलन; ‘जिका’च्या कामाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:17 AM
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसहाय्य करणार आहे. याबाबत जिका आणि महापालिकेत करार करण्यात आला आहे.त्यानुसार प्रकल्प नियोजनाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिका नियुक्त केलेल्या कन्स्लटंटचे शिष्टमंडळ नागपुरात आले आहे. बुधवारी आयुक्त सभागृहात आयोजित बैठकीत शिष्टमंडळाने महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
ठळक मुद्देशिष्टमंडळाचे आगमन : प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भात आयुक्तांची शिष्टमंडळासोबत बैठक