शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

बंगलोर-दिल्ली विमानाचे नागपुरात आकस्मिक लँडिंग; अखेरीस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 1:09 PM

बंगलोरहून दिल्लीकडे जात असलेल्या विमानाचे काही तांत्रिक कारणांमुळे नागपूर विमानतळावर शनिवारी पहाटे दीड वाजता आकस्मिक लँडींग करण्यात आले.

ठळक मुद्दे फ्युएल इंडिकेटरमध्ये बिघाड प्रवाशांना चार तास विमानात बसविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  विमानाच्या फ्युएल इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे स्पाईस जेटचे बेंगळुरू येथून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे शुक्रवारी रात्री १.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.प्रवाशांना कुठलीही माहिती न देताना पहाटे ५.३० वाजेपर्यंत विमानात बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना विमानातून उतरविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला. विमानात एकूण १५३ प्रवासी होते. यादरम्यान एक महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेंगळुरू येथून उड्डाण भरणारे विमान रात्री १२.४५ वाजता दिल्लीला पोहोचते. पण तांत्रिक कारणांमुळे विमानाचा मार्ग बदलून ते नागपुरात उतरविण्यात आले. स्पाईसजेट विमान कंपनीचे काऊंटर नागपुरात नसल्यामुळे प्रवासी अन्य काऊंटरवर चौकशी करीत असताना कुणीही दाद दिली नाही. दिल्ली येथील प्रवासी अरविंद गुगलानी यांनी सांगितले की, बेंगळुरू येथून शुक्रवारी रात्री १० वाजता विमानाने उड्डाण भरले. रात्री १२.४५ ते १ च्या दरम्यान विमान दिल्लीला पोहोचते. पण रात्री १.३० च्या सुमारास विमान नागपूर विमानतळावर उतरविले. विमान का उतरविले, याबद्दल कुणीही सांगितले नाही. पहाटे ५.३० पर्यंत विमानातच बसवून ठेवले. त्यानंतर विमानतळावर उतरविण्यात आले. दिल्लीला नेणारे विमान केव्हा येणार याची विमानतळावरील अन्य कंपन्यांच्या काऊंटरवर चौकशी केली असता कुणीही सांगण्यास तयार नव्हते. विमानतळ प्राधिकरणाने केवळ चहा आणि पाण्याची व्यवस्था केली.यादरम्यान एका प्रवाशाला अपेंडिक्सचा त्रास होता. त्यांच्यासाठी रुग्णवाहिका आणायला अर्धा तास विलंब झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विमान सकाळी ११.३० वाजता दिल्लीकडे रवानाअखेर स्पाईसजेट कंपनीने दुसऱ्या विमानाची करून प्रवाशांना दिल्लीला रवाना केले. हे विमान सकाळी ११.३० नागपुरातून निघून दुपारी १.२० वाजता दिल्लीत पोहोचल्याचे माहिती गुगलानी यांनी दिली.

 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर