शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

By योगेश पांडे | Published: November 16, 2024 5:53 AM

जातीय समीकरणांचे गणित साधून मतदारांना खेचून आणणे हे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान आहे.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत; तर एकेकाळचा पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा सर करण्यासाठी काँग्रेसने दंड थोपटले आहेत. मात्र हलबा समाजाचे रमेश पुणेकर यांच्या आव्हानामुळे लढतीत रंगत आली आहे. भाजपचे प्रवीण दटके व काँग्रेसचे बंटी शेळके या तरुण उमेदवारांमध्ये जनतेत जाऊन प्रचार करण्याची स्पर्धाच सुरू आहे. अर्थात यावेळी बरीचशी समीकरणे बदलली असल्यामुळे थेट प्रचारासोबत गनिमी काव्यावरदेखील भर दिला जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या या मतदारसंघात हलबा, मुस्लिम या समाजाच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. मात्र महाविकास आघाडी व महायुतीकडून या दोन्ही समाजांतील उमेदवार देण्यात आलेले नाहीत. हलबा समाजाला आमदार, उपमहापौर, नगरसेवक आदी पदे देणाऱ्या भाजपने तीनवेळचे आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापले. पंधरा वर्षांत प्रथमच हलबा उमेदवार दिला नाही. त्यामुळे समाजाने एकत्र येऊन माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांना रिंगणात उतरविले आहे. अशा स्थितीत जातीय समीकरणांचे गणित साधून मतदारांना खेचून आणणे हे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांना या मतदारसंघातून ९६ हजार ९०५ मते मिळाली; तर विकास ठाकरे यांना ७१ हजार ४४ मते मिळाली. गडकरी यांचे मताधिक्य २५ हजार ८६१ इतके होते. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत गडकरींचे मताधिक्य ३ हजार ३५४ मतांनी वाढले.

पाच मुस्लिम उमेदवारांचा प्रभाव किती?या मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात असून त्यात पाच उमेदवार मुस्लिम आहेत. त्यांच्यामुळे किती मतविभाजन होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. एमआयएमने मात्र येथे उमेदवार दिलेला नाही. बसपाने मिलिंद गजभिये यांना उभे केले आहे; तर वंचित बहुजन आघाडीने हाजी मोहम्मद कलाम यांना पाठिंबा दिला आहे.

हटके गृहसंपर्क करण्यावर भरशेळके, दटके व पुणेकर यांच्याकडून या मतदारसंघात गृहसंपर्कावर जास्त भर देण्यात येत आहे. भाजपकडून दिग्गज नेत्यांच्या सभादेखील लावण्यात आल्या व सिनेस्टार्सच्या रोड शोचेदेखील नियोजन आहे. दटके महिला, ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करताना दिसून येतात, तर बंटी शेळके त्यांची धावती स्टाईल आणि प्रचाराच्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक या मतदारसंघात कमालीचे सक्रिय आहेत. समाजातील सर्वच स्तरांमध्ये संघ स्वयंसेवकांच्या बैठका होत असून जास्तीत जास्त मतदानाचे प्रयत्न सुरू आहेत.

विधानसभा २०१४विकास कुंभारे : भाजप (विजयी) : ८७,५२३अनिस अहमद : काँग्रेस : ४९,४५२ओंकार अंजीकर : बसपा : ५,५३५मो. कामील अन्सारी : राष्ट्रवादी : ४,८१८आभा पांडे : अपक्ष : ४,४४९

विधानसभा : २०१९विकास कुंभारे : भाजप (विजयी) : ७५,६९२बंटी शेळके : काँग्रेस : ७१,६८४अब्दुल शारीक पटेल : एआयएमएआयएम : ८,५६५नोटा : २,१४९धर्मेंद्र मंडलिक : बसप : १,९७१

लोकसभेतील मते (२०२४)नितीन गडकरी : भाजप : ९६,९०५विकास ठाकरे : काँग्रेस : ७१,०४४योगीराज लांजेवार : बसपा : १,०४९

एकूण उमेदवार : २०एकूण मतदार : ३,४१,१६९पुरुष मतदार : १,६८,१०७महिला मतदार : १,७३,०२२तृतीयपंथी मतदार : ४०

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा