आज देशव्यापी संप : जिल्ह्यातील ५५ हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचा दावा, काहींचा मात्र विरोधनागपूर : केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी धोरण, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी,श्रम कायदा , बेकायदेशीर ठेकेदारीवर प्रतिबंध घालण्यात यावा. आदी मागण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, देशातील ११ केंद्रीय कामगार संघटना, उद्योग, सेवा आस्थापनावरील कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र महासंघाने केलेल्या आवाहनानुसार २ सप्टेंबरला होणाऱ्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील ५५ हजार कर्मचारी सहभागी होणार असून हा संप शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व म.रा.जि.प.कर्मचारी संघटना यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात हा संप यशस्वी करण्याचे संयुक्त आवाहन केले आहे. मात्र काही संघटनांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)राज्य जि.प.कर्मचारी महासंघकामगारांच्या विविध मागण्या संदर्भात संयुक्त क ृती समितीच्या वतीने आयोजित संपात जिल्हा परिषदेतील कर्मचारी सहभागी होतील. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल.अशोक थूलप्रदेश सरचिटणीस, म.रा. जि.प.कर्मचारी महासंघवन व सामाजिक वनीकरणकामगारांच्या विविध मागण्या संदर्भात संयुक्त क ृती समितीच्या वतीने आयोजित संपात वन विभागाच्या सर्व विभागीय कार्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. हा संप यशस्वी होईल. प्रदीप शेंडेकार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कर्मचारी संघटनाकर्मचारी मध्यवर्ती संघटनाकेंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात हा संप आहे. यात राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होत आहे. या निमित्ताने कामगार व कर्मचाऱ्यांची एकजूट बघायला मिळणार आहे.नारायण समर्थकार्याध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाशासकीय वाहन चालक संघटनाकामगाराच्या विविध मागण्या मार्गी लागाव्या, यासाठी पुकारण्यात आलेला लाक्षणिक संप शंभर टक्के यशस्वी होईल. विभागातील शासकीय वाहनावरील वाहन चालक या संपात सहभागी होतील.नाना कडवेकार्याध्यक्ष, शासकीय वाहन चालक संघटनासेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनकेंद्र व राज्य सरकार उद्योगपतींच्या दबावात काम करीत आहे. कामगार कायद्यात बदल करून त्यांच्या सेवा सुरक्षेवर हल्ला करीत आहे. याला आळा घालण्यासाठी २ सप्टेंबरच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स ने घेतला आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल. विश्वनाथ आसईमहासचिव, सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनमहसूल कर्मचारी तृतीय वर्गमहसूल विभागातील तृतीय कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. नागपूर जिल्ह्णातील ४५० तर विभागातील ४ हजार कर्मचारी सहभागी होतील. महसूल विभागात हा संप यशस्वी होईल.प्रमोद बेलेकार्याध्यक्ष, महसूल कर्मचारी तृतीय वर्ग संघटनाकारागृह मुद्रणालय कामगार संघसंपात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी राष्टीय मध्यवर्ती कारागृह संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पेशकर तर राष्ट्रीय ओद्योगिक मुुद्रणालय कामगार संघाचे श्रीधर तराडे यांनी व्दार सभा घेतल्या. मुद्रणालयातील कर्मचारी संपात सहभागी होतील. बुधाजी सूरकरकोषाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटनाराष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ११ राष्ट्रीय कामगार संघटनांनी १२ मागण्यासाठी २ सप्टेंबरचा संप पुकारला आहे. या संपात इंटक, आयटक, बी.एम.एचएमएस, सीटू आदी प्रमुख संघटनांच्या माध्यमातून संप यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे. हा संप यशस्वी होईल. प्रदीप कोकासजनसंपर्क अधिकारी, राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघसार्वजनिक बांधकाम विभाग२ सप्टेंबरच्या देशव्यापी संपाला सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचा पाठिंबा आहे. परंतु सरकारने आश्वासन दिल्याने संघटना या संपात सहभागी होणार नाही. नरेश साखरे, अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनाबँक एम्प्लॉईज फेडरेशन ११ राष्ट्रीय ट्रेड युनियन व आॅल इंडिया असोसिएशनच्या आवाहनानुसार देशभरातील बँक कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. बँक एम्प्लाईज फेडरेशन ईस्टर्न, महाराष्ट्रने यात सहभागी होण्याचा निणंय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी करावा व कस्तूरचंद पार्क येथील सभेत सहभागी व्हावे.व्ही.व्ही.असई, जनरल सेक्रेटरीग्रामसेवक युनियन२ सप्टेंबरला कर्मचारी व कामगारांच्या विविध मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने घेतला आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल. मोरेश्वर काकडेअध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनराष्ट्रव्यापी संपात काही संघटनांचा सहभाग नाहीदेशव्यापी संपात सहभागी न होण्याचा निर्णय काही कर्मचारी व कामगार संघटनांनी घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने काही मागण्यावर सहमती दर्शविली असल्याने संपात सहभागी न होण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आदी संघटनांनी घेतला आहे. कास्ट्राईब कर्मचारी महासंघकेंद्रीय कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. परंतु मागण्यात मागासवर्गीयांची एकही मागणी नसल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णा इंगळेअध्यक्ष,कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,म.रा.भारतीय मजदूर संघकेंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यावर सहमती दर्शविली आहे. किमान वेतन निर्धारणाबाबत भारतीय श्रमिक संमेलन आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वेतन निर्धारित केले जाणार आहे. त्यामुळे संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश चौधरीप्रसिद्धी प्रमुख, भारतीय मजदूर संघकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघकर्मचारी संघटनांनी संप पुकारताना कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भैया शेलारे उपाध्यक्ष,कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघजि.प.कर्मचारी युनियनकेंद्र व राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरणाला विरोध तसेच पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळावे. रिक्त पदे तातडीने भरावी. आदी मागण्यासाठी पुकारलेल्या लाक्षणिक संपात विविध संघटना संपात सहभागी होत आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी होईल,संजय सिंग, अध्यक्ष, म.रा.जि.प.कर्मचारी युनियन नागपूरसंयुक्त कृती समितीदेशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कामगार व कर्मचारी कामावर जाणार नाही. ते कस्तूरचंद पार्क येथील जाहीर सभेत सहभागी होतील. विविध संघटनांचा पाठिंबा असल्याने हा संप शंभर टक्के यशस्वी होईल.अशोक दगडे, निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समितीबांधकाम कर्मचारी संघटनापाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागातील ३ हजाराहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. कर्मचाऱ्यांनी दर्शविलेला पाठिंबा लक्षात घेता हा लाक्षणिक संप शंभर टक्के यशस्वी होण्यात कोणतीही शंका नाही.प्रतिभा सोनारेकार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटनाजि.प.कर्मचारी महासंघजिल्हा परिषदेतील अभियंते, लेखा कर्मचारी,लिपीक वर्ग, आरोग्य विभागातील कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. कर्मचाऱ्यांचा मिळत असलेला पाठिंबा विचारात घेता हा संप यशस्वी होण्यात कोणतीही शंका नाही. गोपीचंद कातुरेअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघआयुर्विमा कर्मचारी महासंघभारतीय आयुर्विमा महामंडळात हा संप यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कर्मचारी संपात सहभागी होऊ न आपापल्या कार्यालयापुढे सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करतील.अनिल ढोकपांडेसरचिटणीस, विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनमहसूल कर्मचारी संघटनानागपूर महसूल विभागातील सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार २ सप्टेंबरच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय विभागीय महसूल कर्मचारी संघटनेने घेतला आहे हा संप शंभर टक्के यशस्वी होईल. गोपाल ईटनकरअध्यक्ष,विभागीय महसूल कर्मचारी संघटनाजि.प.कर्मचारी महासंघ२ स्प्टेंबरचा संप हा देशव्यापी आहे. काही संघटनांनी महाराष्ट्रात संप मागे घेतल्याचा अपप्रचार चालविला आहे. परंतु कर्मचारी याला बळी पडणार नाही. हा संप शंभर टक्के यशस्वी होईलएन.एल.सावरकरसरचिटणीस, जि.प.कर्मचारी महासंघ
संपासाठी कर्मचारी व कामगार संघटना सज्ज
By admin | Published: September 02, 2015 4:19 AM