शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' संपेना; स्थायी समितीची बैठकही रद्द

By गणेश हुड | Published: November 18, 2023 2:59 PM

दोन दिवसाची सुटी टाकून सलग नऊ दिवसाची दिवाळी  

नागपूर : पाच दिवसाच्या सुट्यानंतर गुरुवारी शासकीय कार्यालये सुरु झाली. परंतु ती नावासाठीच, दोन दिवसानंतर शनिवार व रविवार आल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी गुरुवार व शुक्रवारी सुटीचा अर्ज देत सलग नऊ दिवस दिवाळीचा आनंद लुटला. बहुसंख्य कार्यालयात शुकशुकाट असल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक रद्द करून पुढे ढकलावी लागली. 

काही विभाग प्रमुख ड्युटीवर होते. मात्र त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची जबाबदारी असल्याने ते आले होते. यामुळे ते स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. ग्रामीण भागातील विकास कामाच्या व गावातील अडीअडचणीवर मार्ग निघेल या आशेने नागरिक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येतात. स्थायी समितीच्या बैठकीतही महत्वाच्या विषयावर चर्चा होणार होती. परंतु विभाग प्रमुखच उपस्थित नसल्याने जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांना बैठक रद्द करावी लागली. 

जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयांना दिवाळीनिमित्त शनिवार आणि रविवार अशा जवळपास पाच दिवसांच्या सुट्या आल्या. गुरुवार (१६ नोव्हेंबर) पासून शासकीय कार्यालये पुन्हा सुरू झालीत. परंतु गुरुवार, शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवारला पुन्हा शासकीय सुटी आल्याने काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही या दोन दिवसांच्या सुट्या टाकून संपूर्ण  आठवडाच वीकेंड म्हणून साजरा केला.  शुक्रवारी शासकीय कायार्लयात शुटशुकाट होता. मोजकेच  कर्मचारी उपस्थित होते. आता  सोमवारपासून कामकाज  पूर्ववत होईल,अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली.शाळांना सुटी असल्याने पर्यटनाचा बेत

दिवाळी निमित्ताने शाळांना सुटी असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाच दिवसाच्या सुटीनंतर गुरुवार व शुक्रवारची सुटी टाकून सलग नऊ दिवस दिवाळीचा आनंद लुटला. शाळांना सुटी असल्याने अनेकांनी कुटुंबियासह पर्यटनाला जाणे पसंत केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारीnagpurनागपूर