नागपूर : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महाबीज महामंडळ, वन विकास महामंडळ, वखार महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन महामंडळ या पाचही महामंडळातील अधिकारी आणि कर्मचारी बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारत आहेत.
या पाचही या महामंडळातील विविध संघटनांनी एकत्र येऊन सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कृती समिती स्थापन केली. मात्र शासनाने महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवल्याने हे काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कृती समितीने यापूर्वी आपल्या मागण्यंसाठी ८ जूनपासून काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरू केले होते. पुढील टप्प्यात हे काम बंद आंदोलन आहे.
...
कामकाज होणार प्रभावित
शेतीच्या हंगामाचे हे महत्वाचे दिवस असल्याने या संपाचा कामकाजावर परिणाम होणार आहे. वनरक्षक, वनपाल हे क्षेत्रीय कर्मचारी असल्याने वन क्षेत्रामधील वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या व रोपवनाच्या कामावर परिणाम होण्याची तसेच वानिकी कामे ठप्प झाल्याने स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारावर परिणाम होणार आहे. संप कालावधीत होणारे नुकसान टाळण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी केली आहे.
...