नागपूर : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी राष्ट्रीय विरोध दिन पाळला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, म.रा. जि.प. कर्मचारी महासंघ आणि म.रा. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या तीनही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राष्ट्रीय विरोध दिवस पाळण्यात आला. नागपूर जिल्ह्यात विविध सरकारी कार्यालये व संघटनांच्या कार्यालयांपुढे भोजन सुट्टीत धरणे प्रदर्शन करण्यात आले. धरणे प्रदर्शनानंतर आपल्या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, सरचिटणीस अशोक दगडे यांच्यासह अशोक थुल, बुधाजी सुरकर, यशवंत कडू, नाना कडबे, केशव शास्त्री, नारायण समर्थ, मंगला जाळेकर, सुनील व्यवहारे, प्रल्हाद शेंडे, श्याम वांदिले, स्नेहल खवले, मनिष किरपाल, राजेंद्र ठाकरे, प्रशांत राऊत आदी सहभागी झाले होते.
कर्मचारी संघटनांनी पाळला अ.भा. विरोध दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:10 AM