शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मनरेगाच्या माध्यमातून राज्यात ३२.७१ लाख लोकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 9:03 PM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्यात २०१८-१९ या वर्षात १७ लाख ९० हजार कुटुंबातील सुमारे ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात ८४६ लक्ष मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. मागील पाच वर्षांत सर्वाधिक मनुष्यदिन निर्मितीचे लक्ष्य राज्यात पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत १ लाख ४२ हजार सिंचन विहिरी२.४३ लक्ष एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभवेळेवर मजुरीचे वाटपामध्ये भंडारा-बुलडाण्याचा अग्रक्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्यात २०१८-१९ या वर्षात १७ लाख ९० हजार कुटुंबातील सुमारे ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात ८४६ लक्ष मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. मागील पाच वर्षांत सर्वाधिक मनुष्यदिन निर्मितीचे लक्ष्य राज्यात पूर्ण केले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावातच १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असून, रोजगाराची हमी राज्य शासनाने दिली आहे. संपूर्ण राज्यामध्ये या योजनेतून अंमलबजावणी सुरू आहे. राज्यामध्ये या योजनेच्या सन २०१८-१९ या वर्षात २ हजार ३९६ लक्ष ७९ हजार कोटी रुपये खर्च झाला असून, यामध्ये मजुरीकरिता (अकुशल) १ हजार ६५४ कोटी तर साहित्य व पुरवठ्याकरिता (कुशल) ७४२ कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. हा खर्च मागील पाच वर्षांमध्ये सर्वात जास्त आहे. ग्रामपंचायत पातळीवरील योजनांचा केंद्रबिंदू ठेवून त्यांच्याच गावात १०० दिवस रोजगार उपलब्ध करून दिला असल्याने, गावातच रोजगार मिळत असल्यामुळे मजुरांवर स्थलांतर करण्याची वेळ येत नाही. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये नियोजनाला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक वर्षी कामाचा वार्षिक आराखडा तयार करून २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये ग्रामसभा घेऊन कामे मंजूर करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक गावाचे लेबर बजेट तयार झाले आहे. मागील पाच वर्षांत सर्वाधिक म्हणजे १७ लाख ९० हजार कुटुंबातील ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यावर ८४६.०१ लक्ष मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. मागील वर्षी ८२५.३२ मनुष्यदिन निर्मिती झाली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात विविध वैयक्तिक कामांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात २१ हजार कामे पूर्ण झाली असून, या वर्षात २ कोटी ०७ लक्ष वैयक्तिक कामे या योजनेंतर्गत पूर्ण झाली आहेत. सर्वाधिक वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यात २० हजार ३६५ कामे, अमरावती १५ हजार २९३, जळगाव १२ हजार ५०५, यवतमाळ ११ हजार ८४० तर नंदूरबार जिल्ह्यात ११ हजार ६२१ कामे पूर्ण झाली आहेत.सिंचन विहिरींना प्राधान्य 

मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे स्वत:ची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सिंचन विहिरींना प्राधान्य देण्यात आले आहे. या विहिरींसाठीच्या कामाला तीन लाख रुपयांची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात सन २०१८-१९ या वर्षात ३९ हजार सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे मागील पाच वर्षांमध्ये १ लक्ष ४२ हजार सिंचन विहिरी पूर्ण झाल्या असून, प्रति विहीर सरासरी दोन एकर याप्रमाणे किमान २ लाख ८४ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. राज्यात सर्वाधिक सिंचन विहिरी बीड जिल्ह्यात ३ हजार ८०८ पूर्ण झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार २९७, धुळे ३ हजार १०७, अमरावती २ हजार ९७० तर जालना जिल्ह्यात २ हजार ४६८ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत.मजुरांना ९४.०१ टक्के वेळेवर मजुरीचे वाटपमनरेगांतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मजुरीचे प्रदान वेळेत करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली असल्यामुळे मजुरांना वेळेवर मजुरी देण्यात येत आहे. २०१४ मध्ये केवळ २६.४२ टक्के एवढी वेळेवर मजुरी प्रदान करण्यात येत होती. २०१८-१९ या वर्षात वेळेवर मजुरी प्रदान करण्याची टक्केवारी ९४.०१ झाली आहे. भंडारा व बुलडाणा जिल्ह्यात मजुरांना वेळेवर मजुरी दिल्या जाते. नागपूर जिल्ह्यात ९९.९२ टक्के , नंदूरबार जिल्ह्यात ९९.७६ टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात हेच प्रमाण ९९.४६ टक्के एवढे आहे. मजुरांना वेळेवर मजुरी मिळावी यासासाठी मनरेगा आयुक्तालयातर्फे नियमित पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त के.एस.आर. नायक यांनी दिली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMaharashtraमहाराष्ट्र