महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियननागपूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तामिळनाडू शासनाच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. सेविकांना दरमहा १० हजार रुपये आणि वर्षाला १०० रुपये तर मदतनिसांना ७ हजार रुपये आणि वर्षाला ७० रुपये वाढ द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळ््याच्या व जिल्हा परिषद तसेच नगर परिषद शाळेप्रमाणे सुट्या द्याव्यात, आजारपणातील रजा द्यावी आदी मागण्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने विधानभवनावर काढलेल्या मोर्चाद्वारे रेटून धरल्या. मोर्चातील माधुरी क्षीरसागर, तारा बन्सोड, मंगल जेदे, सुनीता धनले आदींच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांची भेट घेतली. त्यांनी आगामी तीन दिवसात वित्तमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.नेतृत्व सुकुमार दामले, दिलीप उटाणे, माधुरी क्षीरसागरमागण्या :अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्याअंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, थकबाकी त्वरित द्यामहिला सबलीकरण समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांप्रमाणे सुट्या द्याव्याअंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारी रजा द्याव्याअंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या रिक्त जागा त्वरित भरा
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या
By admin | Published: December 09, 2015 3:36 AM