शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

लघु उद्योग व भारतीय स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्या; संघ परिवाराची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:34 PM

देशांतर्गत उद्योगाची वाढ होण्यासाठी स्वदेशीवर संघ परिवाराचा भर आहे. स्वदेशीच्या प्रसारासाठी डिजिटल जागृतीवर भर देण्यात येत असून स्वदेशी स्वावलंबन मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांत जनजागृती करण्यात येत आहे.

ठळक मुद्देस्वदेशीच्या प्रसारासाठी डिजिटल जागृतीवर भर

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना तसेच गलवान खोऱ्यातील घटनांमुळे भारतीयांमध्ये चीनविरोधात संताप निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या विविध संघटनांनीदेखील पुढाकार घेतला आहे. देशांतर्गत उद्योगाची वाढ होण्यासाठी स्वदेशीवर संघ परिवाराचा भर आहे. स्वदेशीच्या प्रसारासाठी डिजिटल जागृतीवर भर देण्यात येत असून स्वदेशी स्वावलंबन मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांत जनजागृती करण्यात येत आहे. विशेषत: लघु उद्योग व स्टार्टअप्सला समाजाने जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडण्यात येत आहे.

स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत संघ परिवाराला अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. स्वस्त दरात विक्रीच्या नावाखाली चीनमधून आयात होणाºया अनेक वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. डोकलाममध्ये चीनने कुरापती केल्यानंतर २०१७ साली संघातर्फे चिनी ड्रॅगन विरोधात देशभरात मोहीम राबविण्यात आली होती.सीमेवर धोकादायक ठरु शकणारा चीन आर्थिक बाबतीतदेखील घातक असल्याने संघ परिवाराने त्यांना आर्थिक दणका देण्यासाठी मे महिन्यापासून स्वदेशी स्वावलंबन मोहिमेला वेग दिला आहे.

याअंतर्गतच नागरिकांकडून डिजिटल अर्ज भरुन घेण्यात येत आहे. आतापर्यंत या माध्यमातून देशभरात लाखो लोकांपर्यंत पोहोचून जागृती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सणांमध्ये स्वदेशीवर फोकस करापुढील कालावधी हा विविध सणांचा राहणार असून विदेशी व विशेषत: चिनी बनावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात दिसून येतात. परंतु सणांच्या कालावधीत विदेशी सामान टाळण्यासंदर्भातदेखील संघ परिवाराकडून जागृती करण्यात येत आहे. स्वदेशी जागरण मंचसह संघ परिवारातील विविध संघटना यात समाविष्ट आहेत. विदेशी उत्पादनांच्या बदल्यात कुठली भारतीय उत्पादने उपलब्ध आहेत, याची माहितीदेखील या मोहिमेंतर्गत ऑनलाईन माध्यमातून देण्यात येत आहे.

प्रत्यक्ष गृहसंपर्क नाहीएरवी अशा उपक्रमांत समाजात प्रत्यक्ष गृहसंपर्कावर भर असतो. परंतु कोरोनामुळे प्रत्यक्ष घरोघरी जाणे हिताचे नाही. त्यामुळेच डिजिटल माध्यमावर भर देण्यात येत आहे. स्वदेशी स्वावलंबन मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना स्वदेशीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजातील विविध मान्यवर व्यक्ती तसेच संघटनादेखील यात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय विचार विभाग प्रमुख अजय पत्की यांनी दिली.

टॅग्स :businessव्यवसायRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ