लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) गटग्रामपंचायतच्या उपसरपंच व एका सदस्यास ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अपात्र ठरविले. माजी ग्रामपंचायत सदस्य पंकज लाेलुसरे यांच्या तक्रारीवर हा निवाडा नुकताच देण्यात आला.
उपसरपंच संगीता सुरेश काळे व दीपाली घनश्याम पराये, अशी अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. संगीता काळे व दीपाली पराये यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायतचे माजी सदस्य पंकज लाेलुसरे यांनी २० ऑक्टाेबर २०१९ राेजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती. या तक्रारीच्या अनुषंगाने नरखेड पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी प्रशांत माेहाेड यांच्या मार्फत चाैकशी करण्यात आली.
चाैकशी समितीच्या अहवालानंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू झाली. अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी दाेन्ही पक्षांची मते नाेंदवून घेत चाैकशी अहवालाचे अवलाेकन केले. यात ग्रामपंचायतच्या दाेन्ही सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनी उपसरपंच संगीता काळे व ग्रामपंचायत सदस्य दीपाली पराये यांना ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अपात्र ठरविले. यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ह), १४ (१) (ज) आणि व कलम १६ चा आधार घेण्यात आला.
...
दाेन्ही पदे रिक्त
नारसिंगी-नायगाव (ठाकरे) गटग्रामपंचायत मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत आहे. येथील सरपंचाविरुद्ध काही दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे येथील सरपंचपद रिक्त झाले. आता उपसरपंचाला अपात्र घाेषित केल्याने हेही पद रिक्त झाले आहे. या तिन्ही जागांसाठी पाेटनिवडणूक हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या गटग्रामपंचायतचा कारभार प्रशासकाकडे साेपविला आहे.
120921\img-20210910-wa0184.jpg
फोटो ओळी. नेहमी चर्चेत असणारी गट ग्राम पंचायत नारसिंगी व नायगाव (ठाकरे).