आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रसिद्ध गांधीसागर तलावाच्या सौंदर्याला अतिक्रमणाचा डाग लागला आहे. तलाव परिसरातील फूटपाथवर पान, चहा, नाश्त्याच्या टपऱ्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रोडवरून चालावे लागते. अपघात होण्याची सतत भीती असते. महापालिका व पोलीस प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करणे आवश्यक झाले आहे,परंतु कारवाई होत नाही.परिणामी अतिक्रमणधारक व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सामान्यत: शहराच्या मध्य भागात तलाव राहत नाही. याबाबतीत नागपूर नशीबवान आहे. गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते. तलावाच्या चारही बाजूने रेलिंग, लाईटस् व फूटपाथवर टाईल्स लावण्यात आल्या होत्या. असामाजिक तत्त्व व अतिक्रमणधारकांनी या सौंदर्यीकरणाचे प्रचंड नुकसान केले आहे. लाईटस् व रेलिंग चोरीला गेले आहे. टाईल्स उखडल्या आहेत. फूटपाथवरील सिमेंट बाकांना लावण्यात आलेल्या रेलिंगही चोरीला गेल्या आहेत. पारसी समाजाचे धार्मिकस्थळ असलेल्या अग्यारीपुढे रोज असामाजिक तत्त्वाचे नशापाणी सुरू असते. ते सिगारेटचा धूर सोडत असतात. दारू पित असतात. खºर्याच्या पिचकाºया उडवीत असतात. त्यामुळे सायंकाळपासून या परिसरात महिला व तरुणींचे जाणे-येणे बंद होते.
ट्रॅव्हल्सची अवैध पार्किंगरमण सायन्स सेंटर व टाटा पारसी शाळेपुढे ट्रॅव्हल्स अवैधरीत्या पार्क केल्या जातात. तेथून प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पोलीस कारवाईबाबत उदासीन दिसून येत आहेत
खाऊ गल्ली कोणत्या कामाचीमहापालिकेने गांधीसागर तलाव परिसरात खाऊ गल्ली प्रकल्प उभारला.परंतु या ठिकाणी खाद्यान्नाच्या स्टॉल्सऐवजी असामाजिकतत्त्वांचा वावर असतो. प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे सुरू असतात. यापूर्वी एम्प्रेस मिलजवळ बांधलेले स्टॉल्स जनावरे बांधण्यासाठी उपयोगात आणले जात होते.