लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण येत्या दहा दिवसामध्ये हटविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला ही ग्वाही दिली. तसेच, या कारवाईकरिता पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले.यासंदर्भात श्री साईबाबा सेवा मंडळाने याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. श्री साईबाबा सेवा मंडळाने ३१ डिसेंबर १९७४ रोजी पी. के. बॅनर्जी व शिबाणी बॅनर्जी यांची १० हजार ८९४ चौरस फुटाची जमीन (ख. क्र. ४३/४) ३५ हजार रुपयांमध्ये तर, लक्ष्मण भोयर व इतरांची ४५०० चौरस फूट जमीन (ख. क्र. ४३/६) ९३ हजार ५०० रुपयांमध्ये खरेदी केली. दोन्ही जमिनी विवेकानंदनगर येथे आहेत. या जमिनीच्या काही भागावर ९ व्यक्तींनी अतिक्रमण करून दुकाने बांधली आहेत. १९ मार्च १९९९ रोजी अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर या व्यक्तींनी दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले होते. परंतु, त्यांना संबंधित जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करता आला नाही. दरम्यान, १ जानेवारी २०२० रोजी महानगरपालिकेने सर्वांना नोटीस बजावून जमीन रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अतिक्रमण कायम आहे. दर गुरुवारी ५० हजारावर भाविक साईबाबांच्या दर्शनाकरिता मंदिरात येतात. त्यांना पार्किंगकरिता त्रास सहन करावा लागतो. मंदिर परिसरातील अतिक्रमणामुळे वाहने पार्किंगची व्यवस्था करता येत नाही असे मंडळाचे म्हणणे आहे. मंडळातर्फे अॅड. तुषार मंडलेकर तर, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.
साई मंदिरातील अतिक्रमण दहा दिवसात हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 7:35 PM
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण येत्या दहा दिवसामध्ये हटविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही ग्वाही दिली. तसेच, या कारवाईकरिता पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले.
ठळक मुद्देमनपाची हायकोर्टात ग्वाही : पोलीस संरक्षणाकरिता अर्ज केला