नागपूर : मॉडेल मिल मेन गेट ते अशोक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वस्ती आहे तर दुसऱ्या बाजूला फूटपाथ आहे. या फूटपाथवर लोकांनी कबाडीतील साहित्य ठेवलेले आहेत. त्यामुळे येथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना सावध राहून चालावे लागते. यासोबतच हार्डवेअरचा व्यवसाय करणारे रस्त्यावरच रेती, गिट्टी ठेवत असल्याने वाहन घसरण्याची भीती सतत असते आणि त्यामुळे अपघाताची शक्यता कायम असते.
------
उघड्या गटारावर बॅरिकेड्स ()
नागपूर : इमामवाडा येथील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गटाराचे झाकण तुटले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अपघातापासून बचाव करण्यासाठी येथील नागरिकांनी उघड्या गटारावर व आजूबाजूला बॅरिकेड्स ठेवले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
------
पाळीव गुरेढोरे रस्त्यावर ()
नागपूर : इमामवाडा ते रेशीमबागपर्यंतच्या रस्त्यावर येथील नागरिक आपली गुरेढोरे रस्त्यावरच चरण्यासाठी सोडत असतात. ही गुरेढोरे रस्त्यावरच बसून असतात. त्यामुळे बरेचदा रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना अडथळा होतो आणि अपघाताचा सामना करावा लागतो.
------------
विधानभवनाजवळील खड्ड्यावर बॅरिकेड्स ()
नागपूर : विधानभवनाजवळ केबल वायर टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. काम अर्धवट राहिल्याने प्रशासनाने या खड्ड्याजवळ बॅरिकेड्स लावले आहेत. येथून दररोज हजारो लोक वाहनांनी गुजराण करतात. अशा स्थितीत अपघाची शक्यता नाकारता येत नाही.
..............