राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला शहरातील प्रमुख चौकात वीज दिवे बंद ठेवण्याचे आवाहन करून ऊ र्जा बचत केली जाते. तसेच महापालिका मुख्यालयासह झोन कार्यालयातील पंखे, दिवे बदलवून ‘एनर्जी एफिशिएंट’ पंखे व दिवे लावले जात आहेत. सौर ऊ र्जा यंत्र बसवून नागरिकांना ऊ र्जा बचत करण्याचा संदेश दिला जातो. परंतु याच महापालिका मुख्यालयात राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिलेल्या कक्षात ऊ र्जेचा अपव्यय सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महापालिका मुख्यालयात नगरसेवक, पदाधिकारी व नेत्यांची ये-जा कमी झाली आहे. परंतु पक्षांना देण्यात आलेल्या कक्षात दिवसभर पंखे, दिवे व एसी सुरू असतात.‘लोकमत’ने महापालिका मुख्यालयातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांना भेट दिली असता कार्यालयात कुणीही उपस्थित नसताना दिवसभर पंखे व दिवे सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापालिका प्रशासनाला वर्षाला वीज बिलावर १० ते १२ कोटींचा खर्च करावा लागतो. यात बचत व्हावी. यासाठी वर्ष २०१३ मध्ये सत्तापक्षाच्या आवाहनानुसार महापालिका प्रशासनाने ऊ र्जा बचत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे दिशानिर्देश दिले होते. त्यानुसार कार्यालयातील दिवे काढून एलईडी दिवे लावण्यात आले. जुने पंखे काढून ऊ र्जा बचत करणारे पंखे बसविण्यात आले. महापालिका मुख्यालय व झोन कार्यालयात सौर ऊ र्जा संयत्र लावले जात आहेत. महापालिकेच्या नवीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कक्ष आहेत. येथे दिवसभर नागरिकांची ये-जा सुरू असते. विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांच्या कक्षातील एसी सुरू असतात. अनेकदा अधिकारी आपल्या कक्षात नसतानाही दिवे व एसी सुरू असतो.एसीसाठी सर्वाधिक वीज लागते. काही मोजके अधिकारी मात्र कार्यालयातून बाहेर पडताना दिवे,पंखे व एसी बंद करायला सांगतात.
कक्षात शुकशकाट, दिवे मात्र सुरूमहापालिकेत शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. पक्षाचे नगरसेवक म्हणून त्यांना कक्ष देण्यात आले आहेत. निवडणूक अचारसंहितेपूर्वी त्यांच्या कक्षात नेते, नगरसेवक यांची ये-जा असायची परंतु गेल्या काही दिवसात शुकशुकाट आहे. असे असूनही त्यांच्या कक्षातील पंखे व दिवे दिवसभर सुरू असतात. बसपाचे गटनेते लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या कार्यालयात काही कार्यकर्ते दिसतात. त्यांची ये-जा सुरू असते. परंतु कक्षात कुणीही नसताना दिवे व पंखे सुरू असतात. विरोधीपक्ष नेते जोपर्यंत कार्यालयात असतात. तोपर्यंत पंख व दिवे सुरू असतात. ते बाहेर पडल्यानंतर दिवे व पंख बंद करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु अनेकदा ते नसतानाही सुरू असतात.पंखे व दिवे दिवसभर सुरूआचारसंहिता लागू झाल्यापासून सत्तापक्ष नेता यांच्या कक्षात शुकशुकाट असतो. क्वचित नगरसेवक दिसतात. असे असून कक्षात दिवसभर दिवे सुरू असतात. पंखेही सुरू राहतात. अनेकदा विश्रांतीसाठी इतर विभागाचे कर्मचारी येथे जमा झालेले दिसतात. मात्र येथील तैनात कर्मचारी कार्यालय स्वच्छ ठेवतात. वास्तविक माजी महापौर अनिल सोले यांच्या कार्यकाळात पदाधिकारी उपस्थित असेल तरच दिवे व पंखे सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. पदाधिकारी नसेल तर पंखे व दिवे बंद ठेवा. असे सांगण्यात आले होते. महापौर कक्षात अजूनही या निर्देशाचे पालन केले जाते. मात्र सत्तापक्ष कार्यालयात याकडे दुर्लक्ष करून विजेचा अपव्यय सुरू आहे.