लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंग्लंडमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देणाºया डॉक्टरांसाठी रॉयल कॉलेज आॅफ पीडियाट्रिशियन अॅन्ड चाईल्ड हेल्थ (आरसीपीसीएच-यूके)तर्फे घेण्यात येणारी एमआरसीपीसीएच आणि डीसीएच ही परीक्षा नागपुरातही देता येणे शक्य होणार आहे. आरसीपीसीएच-यूके यांच्या पुढाकाराने तसेच एनकेपी साळवे वैद्यकीय संशोधन संस्था व लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा यांच्या सहकार्याने या परीक्षा होणार आहेत. यासाठी परिश्रम घेणाºया डॉ. रमेश मेहता यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला.हर्ड एज्युकेशनल अॅन्ड मेडिकल रिसर्च फाऊंडेशनतर्फे आणि डॉ. अमोल देशमुख व डॉ. सुचिका गुप्ता-देशमुख यांच्या सहकार्याने हा समारोह आयोजित करण्यात आला. मूळचे नागपूरचे व आता यूकेमध्ये स्थायिक झालेले डॉ. रमेश मेहता हे ब्रिटिश असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडियन ओरिजीनचे अध्यक्ष आणि आरसीपीसीएचचे मान्यताप्राप्त सल्लागार आहेत. काही काळापासून भारतातील डॉक्टरांशी ब्रिटनमध्ये भेदभावपूर्ण वागणूक होत असल्याने अस्वस्थ झालेले डॉ. मेहता यांनी संघटना उभारून याविरोधात न्यायालयीन लढा उभारला. इंग्लंडच्या महाराणीच्या हस्ते आॅफिसर आॅफ आॅर्डर आॅफ ब्रिटिश एम्पायर हा नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.डॉ. मेहता यांनी भारतातील आरोग्य व्यवस्था सुधारली जावी (विशेषत: बालकांसाठी) यासाठी रॉयल कॉलेजच्या परीक्षा येथे आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मुंबई व दिल्लीसह सहा शहरात एमआरसीपीसीएच या परीक्षेचे केंद्र सुरू करण्यात आले. ही परीक्षा उत्तीर्ण करणाºयांच्या गुणवत्तेचा विकास होत असल्याचा दावा डॉ. मेहता यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे नागपुरातही ही परीक्षा सुरू व्हावी यासाठीच्या प्रयत्नांनाही यश मिळाले.ग्रामीण भागातील सेवा देणाºया डॉक्टरांसाठी डीसीएच (डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ) ही परीक्षाही येथे होणार आहे. लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा येथे या दोन्ही परीक्षांचे केंद्र राहणार आहे. जानेवारी महिन्यात या परीक्षा होणार असून यासाठी सहभागी डॉक्टरांना दोन दिवस ट्रेनिंग दिले जात आहे. ब्रिटन व भारतातील आरसीपीसीएचची टीम या डॉक्टरांना प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये ब्रिटनमधून डॉ. अॅना मॅथ्यूज, डॉ. वेणुगोपाल, डॉ. सॅम, डॉ. मिथिलेश लाल, डॉ. संतोष अग्रवाल यांच्यासह भारतातील डॉ. अंजन भट्टाचार्य, डॉ. सुजाता त्यागराजन व डॉ. प्रवीण व्यंकटगिरी यांचा समावेश आहे. सत्कार समारोहाला डॉ. उदय बोधनकर, प्रा. निलोफर मुजावार, डॉ. मीनाक्षी गिरीश, रूपाताई रणजित देशमुख, राजेश संघवी आदी उपस्थित होते.
इंग्लंडची वैद्यकीय परीक्षा नागपुरात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:32 AM
इंग्लंडमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देणाºया डॉक्टरांसाठी रॉयल कॉलेज आॅफ पीडियाट्रिशियन अॅन्ड चाईल्ड हेल्थ (आरसीपीसीएच-यूके)तर्फे घेण्यात येणारी एमआरसीपीसीएच...
ठळक मुद्देएनकेपी साळवे वैद्यकीय संस्थेचा पुढाकार : रमेश मेहता यांचा सत्कार