नागपूर : शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नसल्याने नागपूर विभागीय शिक्षण मंडळावरील इंग्रजी विषयाच्या नियामक सभेवर बहिष्कार आंदोलन घेवून बोर्ड अध्यक्ष माधुरी सावरकर व सचिव चिंतामणजी वंजारी यांना निवेदन सादर करण्यात आले. शिक्षणातील महत्त्वाच्या मागण्या संदर्भात गेल्या वर्षापासुन विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनतर्फे अनेक आंदोलन केली.
नागपुरला विधिमंडळावर आंदोलनानंतर प्रश्न सोडवण्याचे शिक्षणमंत्र्यांनी मान्य केले होते, परंतु काहीच झाले नाही. आंदोलनाच्या माद्यमातून जिल्हाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत मंत्र्यांना निवेदन देण्यात आली. तरीसुध्दा कोणत्याही प्रकारची चर्चा व बैठक घेण्याची तसदी घेण्यात आली नाही. शिक्षकांनी वर्षभर केलेली आंदोलने शासनाने बेदखल केल्याने, नाईलाजाने बोर्ड परीक्षेच्या मुल्याकनावर बहिष्कार घ्यायला शासनाने भाग पाडल्याचे विज्युक्टा महासचिव डाॅ.अशोक गव्हाणकर यांनी सांगितले.