लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:
काँग्रेसने नाना पटोले यांना पहिल्या फेरीत २५२२९ एवढी मते मिळाली तर गडकरी यांना ४०८५१ मते मिळाली आहेत. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३० उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजपाचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे, बीआरएसपीचे अॅड. सुरेश माने रिंगणात आहेत.नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले होते. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता नागपुरात ९६ हजार ७४२ एवढे अधिकचे मतदान झाले आहे.२०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांना मात दिली होती. गडकरी यांना ५,८७,७६७ मते मिळाली होती. विलास मुत्तेमवार यांना ३,०२,९१९ मते पडली होती.