शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा, आंतरराज्यीय दांडिया स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 4:32 AM

नागपूर : प्रसिद्ध गायक कुणाल गांजावालाच्या मधुर गाण्याने उत्साहाला आलेली भरती...

नागपूर : प्रसिद्ध गायक कुणाल गांजावालाच्या मधुर गाण्याने उत्साहाला आलेली भरती... प्रचंड जल्लोष... तरुणाईने दिलेली मनसोक्त दाद... कार्यक्रमस्थळी युवक-युवतींनी तालावर धरलेला फेर, दांडियाच्या तालावर थिरकणारे प्रेक्षक... प्रचंड उत्साहाचे वातावरण... त्यात प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव हिने प्रेक्षकांशी साधलेला संवाद... उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून जाणारा आसमंत... अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर मदहोश करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वाºयासह अंगावर झेपावणारी थंडी.... अशा भारावलेल्या वातावरणात आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या रूपातील ऊर्जा, उत्साह अन् कलेचा नेत्रदीपक सोहळा रविवारी चिटणीस पार्क येथे पार पडला.लोकमत सखी मंच, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान व भोजवानी यांच्या सहकार्याने लोकमत सखी मंचच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगतदार ठरली. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. परिणय फुके, भाजपा नेते जयप्रकाश गुप्ता, महापौर नंदा जिचकार, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जोशी, नगरसेविका परिणीता फुके, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, दीपाली भरणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेशी, बँक आॅफ इंडियाचे ए. श्रीधर, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या संचालिका आरती बोदड, डॉ. रिचाज युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, रोकडे ज्वेलर्सचे प्रमुख राजेश रोकडे, गो-गॅस इलाईटचे संचालक नितीन खारा, ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन आदी उपस्थित होते.>गोव्याने पटकावला प्रथम क्रमांकअत्यंत चुरशीच्या ठरलेल्या धमाल दांडियाच्या अंतिम फेरीत दमदार सादरीकरण करीत गोव्याच्या चमूने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ५१ हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. द्वितीय पुरस्कार जळगावच्या चमूने प्राप्त केला. ३१ हजार व आकर्षक ट्रॉफीने त्यांना सन्मानित करण्यात आले. तृतीय पुरस्कार भंडाºयाच्या चमूला मिळाला. २१ हजार व आकर्षक ट्रॉफी त्यांना प्रदान करण्यात आली. नृत्य, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा अशा सर्वच बाबतींत चारही चमूंनी एकमेकांना जोरदार लढत दिली. दैत्यराज आणि महाकालीचे युद्ध, कृष्णाचे गोवर्धन पर्वत उचलणे असे अनेक प्रसंग या स्पर्धकांनी अतिशय सुंदर साकारले. भंडाºयाच्या चमूचे हे देखणे सादरीकरणही प्रेक्षकांना भावले.>लोकमत सखी मंचच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी नागपुरात आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धा-२०१७च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव, प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला, नगरसेविका परिणीता फुके, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, दीपाली भरणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेशी, बँक आॅफ इंडियाचे ए. श्रीधर यांच्यासह मंचावर उपस्थित कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या संचालिका आरती बोदड, डॉ. रिचाज युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, रोकडे ज्वेलर्सचे प्रमुख राजेश रोकडे व कॉन्फिडेन्स ग्रुपचे चेअरमन नितीन खारा.

टॅग्स :nagpurनागपूर