काँग्रेसमध्ये उत्साह, भाजपा बेचैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:17 PM2018-12-11T22:17:52+5:302018-12-11T22:27:39+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभेत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह ...

The enthusiasm in the Congress, the BJP is restless | काँग्रेसमध्ये उत्साह, भाजपा बेचैन

काँग्रेसमध्ये उत्साह, भाजपा बेचैन

Next
ठळक मुद्देजागोजागी विजयाचा जल्लोष : मिठाई वाटली, फटाके फोडलेदेवडिया भवन, मनपातून निघाली बाईक रॅली

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभेत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. देवडिया काँग्रेस भवनात बऱ्याच कालावधीनंतर विजयी जल्लोष बघायला मिळाला. मनपामध्येही काँग्रेसच्या नगरसेवकांनी आनंद साजरा केला. मात्र भाजपाच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. 


देवडिया भवनात जल्लोष
मंगळवारी शहर काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण सुरू होते. काँग्रेस जसजशी विजयाकडे वाटचाल करीत होती, तसतसे कार्यकर्ते जमायला लागले होते. विजयाचा कौल लक्षात येताच फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटायला सुरुवात झाली. ढोलताशांचा गजरावर कार्यकर्ते ठेका घेऊ लागले. उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटोचा, अभिजित वंजारी, ईरशाद अली, महेश श्रीवास, शेख हुसैन, रिंकू जैन, निर्मला बोरकर, अक्षय समर्थ, रमेश पुणेकर, प्रशांत धवड, राजेश पायतोडे, जगदीश गमे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. 

मनपात वाटली मिठाई
मनपाचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात मिठाई वाटून फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. 

युवक काँग्रेसची बाईक रॅली
युवक काँग्रेसचे सचिव बंटी शेळके व शहराध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली. यादरम्यान नागरिकांना मिठाई वाटण्यात आली. रॅलीत फजलूर रहमान कुरैशी, शहनवाज खान चिस्ती, अजहर शेख, नावेद शेख, स्वप्निल ढोके, बाबू खान, विजय मिश्रा, हेमंत कातुरे आदी उपस्थित होते. 

Web Title: The enthusiasm in the Congress, the BJP is restless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.