लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसी हिंगणा औद्योगिक परिसरातील कारखान्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाची भीती दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयाला शुक्रवारी भेट दिली. उद्योजकांनो घाबरू नका, मानक प्रक्रियेचे काटेकोर पालन करा आणि कामगारांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना केले.जिल्हाधिकारी म्हणाले, हिंगणा तालुक्यात सध्या ८१ पॉझिटिव्ह असून १० दिवसांत रुग्ण दुप्पट झाले आहेत. म्हणूनच सर्वांना सावध राहण्याची गरज आहे. कारखान्यांमध्ये काम सुरू असताना आणि दुपारच्या जेवणाच्या व मोकळ्या वेळेत कामगारांमधील अंतर ३ ते ४ फुटांचे असावे, सॅनिटायझरचा वापर दर दोन तासांनी करावा, सतत मास्क वापरावा व तोंड, नाक, कानाला स्पर्श करू नका आणि यंत्रसामग्रीचे निजर्तुंकीकरण करा. एखाद्याला खोकला व सर्दी जास्त दिवस असल्यास त्याची माहिती तातडीने जिल्हा व तहसील प्रशासनाला द्यावी आणि त्या व्यक्तीस तीन दिवस सुटी घेण्याचा सल्ला द्यावा. त्या दरम्यान कोरोना विषाणूची तपासणी करण्याचा आग्रह धरावा. जर त्याची चाचणी निगेटिव्ह आली तर तो या कामात सामील होऊ शकेल अन्यथा त्याला कोविड रुग्णालयात दाखल करावे. एखाद्या कारखान्यात कोविडचा रुग्ण आढळून आल्यास तो कारखाना तीन दिवस बंद ठेवावा.ठाकरे म्हणाले, उद्योजकांनी स्थानिक कामगारांची भरती करावी आणि उत्पादन वाढवावे. हिंगणा आयटीआयसह अकुशल कामगारांचे प्रशिक्षण व कौशल्य विकासावर इंडस्ट्री असोसिएशनने शासनाकडे प्रस्ताव द्यावा. प्रशिक्षण व कौशल्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक फंड प्राथमिकतेवर मंजूर करू. उद्योजकांनी कोविड संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.ईएसआयच्या मुद्यावर उद्योजकांनी ठाकरे यांचे लक्ष वेधले. कोरोना रुग्ण आणि क्वारंटाईन कामगारांना आजारी समजून त्यांना ईएसआय सदस्याने सुटीचा पगार द्यावा, तसेच हिंगणा एमआयडीसी परिसरात आकस्मिक रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. रुग्णालय सुरू करण्याची गेल्या सहा वर्षांपासून मागणी असल्याचे उद्योजक म्हणाले.प्रारंभी असोसिएशनचे सचिव सचिन जैन यांनी रवींद्र ठाकरे यांचे स्वागत केले. असोसिएशनचे अध्यक्ष हिंगणा एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि सोडविण्याचे आवाहन केले. बैठकीला विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॅ. (निवृत्त) सी.एम. रणधीर, नागपूर ग्रामीणच्या एसडीओ इंदिरा चौधरी आणि कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते.
उद्योजकांनो घाबरू नका, नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:46 PM
एमआयडीसी हिंगणा औद्योगिक परिसरातील कारखान्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाची भीती दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयाला शुक्रवारी भेट दिली. उद्योजकांनो घाबरू नका, मानक प्रक्रियेचे काटेकोर पालन करा आणि कामगारांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना केले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे हिंगण्यातील उद्योजकांना आवाहन : कामगारांना सुविधा द्या