लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्योग संचालनालयाचे महाव्यवस्थापक जी.ओ. भारती यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सीमेबाहेर ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार परवानगी घेऊन उद्योजकांनी कारखाने सुरू करावेत, असे आवाहन विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी यांनी केले आहे.उद्योग संचालनालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पूर्वीच्या एमआयडीसी पोर्टलवर उद्योजकांना आॅनलाईन माहिती द्यायची आहे. ज्या युनिट्सने आधीपासून परवानगी घेतली आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत परंतु ज्यांना परवानगी मिळाली नाही त्यांनी बदललेल्या मोबाईल नंबरसह पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर माहिती त्वरित डाऊनलोड करता येईल.पदयात्रा, सायकल, दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचे पास आणि कामगार, कर्मचारी व ग्रामीण भागातील रहिवासी, पोर्टलवर सुधारित भाग-ब चे नाव, पदनाम, वय, मोबाईल क्रमांक वाहनांच्या प्रकारासह माहिती सादर करायची आहे. वाहन क्रमांक, ज्यांनी आधीपासून परवानगी घेतली आहे, अशासह सर्व उद्योगांचे निवासी पत्ता द्यायचा आहे. युनिट पूर्ण सामर्थ्याने ऑपरेट करायचे आहेत. सर्व कर्मचाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांच्या हालचालीसाठी आणि त्यांच्या ग्रामीण भागातील वाहने केवळ भाग बी फॉर्म भरून एमआयडीसी पोर्टलवरुन मिळविता येतील. महानगरपालिका आयुक्त किंवा स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यालयाकडून कोणतेही पास मिळणार नाही. पूर्वी मिळविलेले पास असे नवीन पास होईपर्यंत वापरले जाऊ शकतात.राठी म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एमएचएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एसओपीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. नागपूर शहर ते हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर व इतर कोणत्याही औद्योगिक क्षेत्राकडे जाण्यासाठी सर्व कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी व इतर वाहनांसाठी मनपा आयुक्त कार्यालय, नागपूर येथून पास मिळवावा लागेल. व्हीआयए आणि जिल्हाधिकारी कार्यालय, डीआयसी, एमआयडीसी, महानगरपालिका यासारख्या सर्व प्रशासकीय संस्थांच्या प्रयत्नांनी बहुतांश निर्यात देणारी युनिट्स सुरू झाली आहेत. याशिवाय विस्तृत माहिती व्हीआयए कार्यालयात मिळणार आहे, अशी माहिती व्हीआयएचे सचिव गौरव सारडा, सहसचिव पंकज बक्षी, एक्झिम फोरमचे प्रतीक तापडिया यांनी दिली आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या सीमेबाहेर उद्योजकांनी कारखाने सुरू करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 12:19 AM