माैदा : नगरपंचायतीच्या स्वच्छता व आराेग्य विभागातर्फे शहरातील वाॅर्ड क्र. ११ येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त स्वच्छता व आराेग्य सभापती सुषमा कुंभलकर यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी रमेश कुंभलकर, अंशुल कुंभलकर व नागरिक उपस्थित हाेते. पावसाळ्यात प्रत्येकाने परिसरातील माेकळ्या जागेत वृक्षलागवड करून संवर्धन करावे, असे आवाहन सुषमा कुंभलकर यांनी केले.
......
पाेलीस ठाणे नरखेड
नरखेड : जागतिक पर्यावरण दिनानिमित नरखेड पाेलीस ठाण्यातर्फे वृक्षाराेपण करण्यात आले. नरखेड पाेलीस ठाण्यांतर्गतच्या माेवाड दूरक्षेत्र परिसरात पाेलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. काेराेना महामारीत ऑक्सिजनची कमतरता भासली. ती पूर्ण करण्यासाठी थोड्याफार मेहनतीने प्रत्येकाने वृक्षलागवड करावी. झाडे आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतात. त्यामुळे वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे मत ठाणेदार गिरासे यांनी व्यक्त केले. यावेळी मोवाड चौकीचे पोलीस उपनिरीक्षक महेश बोथले, पाेलीस कर्मचारी गजानन शेंडे, नीलेश खर्डे, सूरज मोहेकर, विश्वनाथ ढोणे, मनीष सोनोने, दिनेश वरठी, साबीर शेख, मिलिंद राठोड आदींची उपस्थिती हाेती.