नागपूर- आज सप्टेंबर 2020नंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची (coronaviruses) संख्या वाढून 1710वर गेल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा हा उद्रेक असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे, ही संख्या आणखी वाढणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. (Eruption of corona virus in Nagpur; During the day 1710 new coronavirus appeared)
नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1,62,053 झाली असून आज 8 रुग्णांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या 4415 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज 10548 चाचण्या झाल्या. त्या तुलेनत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 16.21 टक्के झाले आहे.
CoronaVirus : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 429 जण कोरोना पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भावाला सुरूवात झाली. सहा महिन्यानी म्हणजे सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठाल होता. 18 सप्टेंबर रोजी सर्वाधिक, 2343 नवे रुग्ण आढळून आले होते. परंतु त्यांनतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. नोव्हेंबर महिन्यात तर 50वर रुग्णसंख्या आली होती. परंतु जानेवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादूर्भावाने वेग धरला. 24 फेब्रुवारीपासून रोज हजारावर रुग्णसंख्या जात आहे. पुन्हा सहा महिन्यानंतर मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ग्रामीणच्या तुलनेत शहरात मोठ्या संख्येत रुग्ण वाढत आहे. यावरून महानगरपालिकेची जबाबदारी आणखी वाढणार आहे. आज शहरात 1433 तर ग्रामीणमध्ये 275 रुग्ण आढळून आले.
रेकॉर्ड ब्रेक ! औरंगाबाद जिह्यात मंगळवारी ५५० कोरोना रुग्णांची वाढ