शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:58 PM

Lonar Lake रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश : जीआर जारी करण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत वेळ दिला

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

अमरावती विभागीय आयुक्त हे या प्राधिकरणचे अध्यक्ष, तर बुलडाणा जिल्हाधिकारी सचिव राहतील. प्राधिकरणमध्ये इतर संबंधित सरकारी विभागाचे अधिकारी व दोन अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. याशिवाय, प्राधिकरणमध्ये या प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड.आनंद परचुरे, न्यायालय आयुक्त वरिष्ठ वकील ॲड.सी.एस. कप्तान व सरकारी वकील ॲड.दीपक ठाकरे यांचा समावेश करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. प्राधिकरण स्थापनेचा जीआर जारी करण्यासाठी राज्य सरकारला ११ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

या संदर्भात अ‍ॅड.कीर्ती निपानकर (नागपूर), गोविंद खेकाळे व सुधाकर बुगदाने (दोन्ही बुलडाणा) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. हे प्रकरण गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, न्यायालयाने लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी वेळोवेळी विविध आदेश दिले. असे असले, तरी आणखी बरीची ठोस कामे करायची बाकी आहेत. राज्य सरकारने गेल्या फेब्रुवारीमध्ये लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती आणि लोणार सरोवर विकास आराखडा संनियंत्रण समिती स्थापन करून, त्याविषयी जीआर जारी केले, परंतु न्यायालयाने त्यावर असमाधान व्यक्त केले. लोणार सरोवराकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहण्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला. ॲड.एस.एस. सन्याल यांनी मध्यस्थ म्हणून कामकाज पाहिले.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरHigh Courtउच्च न्यायालय