कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत सध्या संपूर्ण राज्यात निर्बंध जाहीर केले आहेत.
कामगार किंवा त्यांचे कुटुंबीय या दूरध्वनी क्रमांकावर त्यांच्या अडचणी किंवा समस्या सांगू शकतात. त्यांना नियंत्रण कक्षाद्वारे तात्काळ मदत करण्यात येईल. दुसऱ्या राज्यातील कामगारांनादेखील प्रवासाच्या दृष्टीने काही मदत लागल्यास नियंत्रण कक्षास संपर्क करता येईल. तसेच adclngp@gmail.com वरसुद्धा कामगार ई-मेल करू शकतात.
भ्रमणध्वनी, सोशल मीडिया व इत्यादी माध्यमामार्फत प्राप्त झालेल्या कामगारांच्या तक्रारी तसेच आंतरराज्यीय स्थलांतरित कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.
कामगारांच्या मदतीसाठी सरकारी कामगार अधिकारी एम. पी. मडावी, एस. डी. पेंदोर यांच्या नियंत्रणाखाली आंतरराज्यीय स्थलांतरित कामगारांसाठी नियंत्रण कक्ष तथा भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. तरी काही अडचण किंवा समस्या असल्यास कामगारांनी नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अपर कामगार आयुक्त यांनी केले आहे.