नागपूर : कोरोनाच्या निर्बंधकाळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी भ्रमणध्वनी देण्यात आला असून कृषी विभागाचा १८००२३३४००० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या निर्बंध लागू आहेत. यामुळे बियाणे, खते व कीटकनाशकांची गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकरी, वाहतूकदार, विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर अडचणी येण्याची शक्यता गृहीत धरून कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या नियंत्रण कक्षासोबत रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क करता येईल. अडचण किंवा तक्रार ई-मेल पत्त्यावर पाठवता येणार असल्याचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी कळविले आहे.