अध्यक्षस्थानी नाभिक एकता मंचचे संस्थापक-अध्यक्ष धनराज वलुकार, तर उदघाटक गोपाल कडूकर होते. कर्मचारी मंचचे सचिव रवी कुकडे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रमेश (मामा) राऊत प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्र नाभिक एकता मंच सलून पार्लर असोसिएशनमध्ये नोंदणी करून सदस्य प्रमाणपत्र घेण्याचे आणि सर्व सलून पार्लर मालक, कारागीर यांनी एका छत्राखाली कार्य करण्याचे आवाहन वलुकार यांनी केले. यावेळी सलून पार्लर असोसिएशन अध्यक्षपदी गौरव वैरागडे, तर नाभिक एकता मंच अध्यक्षपदी संतोष लांजेवार यांच्यासह प्रत्येक कार्यकारिणीतील १५ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला हरिराम चोपकर, गजानन कूकडकर, राजू तळखंडे, विक्की साबळे, संजय चांदेकर, संतोष वैद्य, संजय मानकर, दयानंद ठाकूर, अशोक इंगळे, लक्ष्मण सराटे, धनंजय उरकुडे , संतोष लांजेवार, रोशन चातूरकर, दीपक अनकर, राजू दारव्हेकर, सतीष चौधरी, नीलेश दर्व्हेकर, जितू फुकटकर, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शरद लक्षणे, संचालन विकास लाखे यांनी केले. आभार विजय लक्षणे यांनी मानले.
नाभिक एकता मंचच्या सलून पार्लर असोसिएशनची कार्यकारिणी स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:10 AM