शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

मुख्यमंत्र्यांच्या ‘क्लास’नंतरही मंत्री, आमदार बिनधास्तच

By admin | Published: December 25, 2014 12:28 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरातील पक्ष कार्यालयात मंत्री, राज्यमंत्री व आमदारांचा क्लास घेत त्यांना शिस्तीचे, नियम व संकेतांचे पालन करण्याचे धडे दिले.

मंत्रीच प्रश्न विचारायला उठले : सत्ताधारी सदस्यांकडून विरोधी भूमिकाकमलेश वानखेडे - नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरातील पक्ष कार्यालयात मंत्री, राज्यमंत्री व आमदारांचा क्लास घेत त्यांना शिस्तीचे, नियम व संकेतांचे पालन करण्याचे धडे दिले. मात्र, त्याचा काहीच परिणाम सत्तापक्षावर झाला नसल्याचे आज विधानसभेत पहायला मिळाले. सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांसारखी भूमिका घेत मंत्र्यांच्या उत्तरावर आक्षेप घेतले. नियमाच्या चाकोरीबाहेर जात प्रश्न मांडू देण्याचा आग्रह धरला. विशेष म्हणजे मंत्रीही प्रश्न विचारायला उठले. मुख्यमंत्र्यांच्या ‘क्लास’नंतरही मंत्री, आमदार बिनधास्त असल्याची प्रचिती आली. नशीब की समोर हे सर्व पहायला विरोधी पक्ष सभागृहात हजर नव्हता. नाही तर सरकारची अधिकच कोंडी झाली असती. मुस्लीम आरक्षणाचे विधेयक विधानसभेत सादर न केल्याचा निषेध करीत विरोधकांनी आजही कामकाजावर बहिष्कार टाकला. आज दिवसभर विरोधी बाके रिकामी होती. त्यामुळे प्रश्न विचारणारेही सत्ताधारी व उत्तर देणारेही सत्ताधारी, असे चित्र होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या तालिमीनंतरही काहींना याचा विसर पडला. केबल व्यावसायिकांकडून मनोरंजन कर वसूल करण्याच्या एका प्रश्नावर स्वत: गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीच उभे राहात महसूलमंत्री खडसे यांना प्रश्न विचारला. मंत्र्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी असते, प्रश्न विचारण्याची नाही कदाचित याचा विसर त्यांना पडला असावा. खाणपट्ट्याच्या प्रश्नावर बोलताना सत्तापक्षाचे (भाजप) सदस्य असलेल्या सुधीर पारवे यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते असलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या लेखी उत्तरावर आक्षेप घेतला. यातून सत्ताधारी अजूनही विरोधी बाण्यातून बाहेर पडले नसल्याची प्रचिती आली. साधारणत: समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून विरोधी पक्षातील सदस्य मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करताना, मंत्र्यांशी खटके उडताना पहायला मिळते. मात्र, आज सत्ताधारी भाजपचे आमदार व राज्यमंत्र्यातच नोकझोक झाली.अमरावतीच्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावर गृहराज्यमंत्री रणजित पाटील ठोस उत्तर देत नसून धोरण सांगण्यात वेळ घालवत असल्याचा आक्षेप डॉ. सुनील देशमुख यांनी घेतला. यामुळे राज्यमंत्री पाटीलही भडकले. असे असेल तर उत्तरच देत नाही म्हणत ते जागेवर बसले. यानंतर शिवसेनेच्या काही सदस्यांनी देशमुखांची बाजू घेत मंत्र्यांनी माफी मागण्याचा आग्रह धरला. शेवटी अध्यक्षांच्या मध्यस्थतीनंतर सत्तापक्षातच रंगलेल्या या कलगितुऱ्याला विराम मिळाला. मंत्र्यांच्या उपस्थितीवरूनही सरकार अडचणीत येता येता राहिले. साधारणत: दररोज दोन मंत्र्यांना ‘कम्पलसरी सिटिंग’ दिली जाते. मात्र, आज सभागृहात दोन वेळा एकही मंत्री उपस्थित न राहण्याची परिस्थिती विधानसभा अध्यक्षांच्या प्रसंगावधानामुळे टळली. कर्नाटकात मराठी भाषकांवर होत असलेल्या अन्यायाची व्यथा सदस्य मांडत असताना सभागृहात शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे एकमेव कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. २.४५ वाजता देसाई जागेवरून उठून बाहेर जायला लागले. तेव्हा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लागलीच बेल वाजवून सभागृहात दुसरे मंत्री उपस्थित नसल्याकडे त्यांचे लक्ष वेधले व त्यांना थांबवून घेतले. काही वेळाने शिवसेनेचे दुसरे मंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आले. शिंदे येताच देसाई बाहेर गेले. ३.१० वाजता शिंदेही उठून बाहेर जाऊ लागले असता पुन्हा अध्यक्षांनी त्यांनाही थांबविले. मराठी भाषकांवरील अन्यायावर एवढी गंभीर चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या मंत्र्यांचे ये-जा सुरू राहिले.