शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

सप्टेंबरच्या शेवटीही पावसाचा विराम, लवकरच करेल रामराम

By निशांत वानखेडे | Published: September 30, 2024 6:59 PM

नागपूर आतापर्यंत १०५६ मि.मी. : विदर्भातही १५ टक्के अधिक पाऊस

नागपूर : दरवर्षी येणाऱ्या पावसाळा ऋतुचे चार महिन्याचे चक्र सप्टेंबरचा शेवटचा दिवस म्हणजे साेमवारी संपले. शेवटच्या आठवड्यात पावसाचा जाेर असेल, असा अंदाज हाेता. मात्र महिन्याच्या शेवटीही पावसाने विराम घेतला. हवामान विभागाने पुढचे पाच दिवस म्हणजे ५ ऑक्टाेबरपर्यंत पावसाबाबत कुठलाही अंदाज व्यक्त केला नसल्याने आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पाऊस लवकरच विदर्भातून गाशा  गुंडाळेल, अशी शक्यता आहे. 

यंदा २१ जूनपासून पावसाचे आगमन झाले पण जाेर उशीराच म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाढला.  जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात फारसा प्रभावी नसलेला पाऊस दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र तीव्रपणे बरसला. २० जुलैपासून मुसळधार बरसलेल्या पावसाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा बॅकलाॅग दूर केला. या काळात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया या जिल्ह्यातील बऱ्याचा गावांचा पुरामुळे संपर्क तुटला हाेता. जुलैप्रमाणे ऑगस्ट महिन्यातही पावसाने कमी दिवसात जास्त बरसात केली. सप्टेंबर महिन्यात सहसा पावसाचा जाेर कमी असताे. मात्र गेल्या वर्षी पावसाची तीव्रता अधिक हाेती. नागपुरात २३ सप्टेंबरला बरसलेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली व तीन हजाराहून अधिक घरात पाणी शिरले हाेते. चार लाेकांचा जीवही गेला. यंदा मात्र पावसाने सप्टेंबर महिन्यात राैद्र रूप धारण केले नाही.

दरम्यान पावसाळ्याच्या सीजनमध्ये नागपुरात आतापर्यंत १०५६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. सीजनमध्ये नागपूर जिल्ह्यात ९७४ ते १००० मिमी पाऊस पडताे. म्हणजे यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस नाेंदविला गेला आहे. विदर्भातही आतापर्यंत सरासरी १०६५ मि.मी. पाऊस झाला असून सरासरीपेक्षा ताे १५ टक्के अधिक आहे.

१५ ऑक्टाेबरनंतर थंडीची चाहुलसाधारण ५ ऑक्टोबरला मान्सून माघारी परतत असताना महाराष्ट्राच्या उत्तरेकडे निघतो व १५ ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून बाहेर पडतो. याच दरम्यान राज्यात मान्सूनच्या शेवटच्या आवर्तनाचा पाऊस होत असतो. गेल्या वर्षी मान्सून शांतपणे परतला होता. यावर्षी ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पडण्याची शक्यता जाणवते. १५ ऑक्टाेबरनंतर थंडीची चाहूल लागेल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसnagpurनागपूर