शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी विमा द्यावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:34 PM

विम्याच्या कालावधीमध्ये चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी, वाहन मालकाला विम्याची रक्कम द्यावी लागेल असा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या वाहन मालकाला विम्याचे २१ लाख रुपये व त्या रकमेवर व्याज देण्यात यावे असे आदेश इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. एवढेच नाही तर, वाहन मालकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्राहक आयोगाचा निर्णय : तक्रारकर्त्याला २१ लाख व व्याज देण्याचा आदेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विम्याच्या कालावधीमध्ये चोरीला गेलेल्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसले तरी, वाहन मालकाला विम्याची रक्कम द्यावी लागेल असा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्या वाहन मालकाला विम्याचे २१ लाख रुपये व त्या रकमेवर व्याज देण्यात यावे असे आदेश इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. एवढेच नाही तर, वाहन मालकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.राधेशाम इंगोले असे वाहन मालकाचे नाव असून ते नरेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी मॅगमा एचडीआय रेनेरल इन्शुरन्स कंपनीकडून ट्रकचा २१ लाख रुपयांचा विमा काढला होता. २१ फेब्रुवारी २०१४ ते २० फेब्रुवारी २०१५ पर्यंत विम्याचा कालावधी होता. मार्च-२०१४ मध्ये ट्रकच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपली. त्यामुळे त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, १२ मे २०१४ रोजी रात्री त्यांचा ट्रक चोरीला गेला. त्यानंतर त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात ट्रक चोरीची तक्रार नोंदवली. तसेच, १६ जुलै रोजी विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला. परंतु, कंपनीने ट्रकच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपल्यामुळे आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रतिपूर्ती झाली नसल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. परिणामी, इंगोले यांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने विविध बाबी लक्षात घेता त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला. इंगोले यांच्या वतीने अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर