शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
5
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
6
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
7
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
8
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
9
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
10
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
11
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
12
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
13
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
14
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
15
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
16
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
17
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
18
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
19
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
20
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक

जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची सक्ती

By सुमेध वाघमार | Updated: December 6, 2024 14:09 IST

तीन एजन्सीला काम : ३१ मार्च २०२५पर्यंत 'एचएसआरपी' लावणे अनिवार्य

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुन्हा करण्यासाठी वाहनांचा होणारा वापर रोखण्यासाठी व नंबरप्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नव्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' (एचएसआरपी) लागू करण्यात आली. आता जुन्या वाहनांनासुद्धा 'एचएसआरपी'ची सक्ती केली जाणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने तीन एजन्सीची नियुक्ती केली असून शुल्कही निर्धारित केले आहे.

राज्यात २०१९ पासून नव्या उत्पादित वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' सक्तीची केली आहे. वाहनाला एकदा ही नंबरप्लेट लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली ही नंबरप्लेट्स 'टॅम्परप्रूफ' असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम व वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत 'इंडिया' (इंग्रजीतील शब्द) अक्षरे लिहिलेली असतात. ही नंबरप्लेट अॅल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनवलेली असते. परिवहन विभागाने ३१ मार्च २०२५ पर्यंत जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' लावणे अनिवार्य केले आहे. 

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आरटीओ तज्ज्ञानुसार, जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' बसविण्याचे काम तीन एजन्सीला देण्यात आले आहे. ही एजन्सी त्या-त्या आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात आपले फ्रेंचायझी सुरू करून वाहनांना नंबरप्लेट लावण्याचे काम करणार आहे. तूर्तास याची सुरुवात झालेली नाही; परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

असे असणार शुल्क                 वाहनाचा प्रकार - ४५० रुपयेदुचाकी व ट्रॅक्टर - ५०० रुपयेतीनचाकी कार व इतर वाहने - शुल्क   ७४५ रुपये

झोन ३ मधील जुन्या वाहनांची जबाबदारी एफटीए एचएसआरपी सोल्युशन्सकडे झोन ३ मधील 'एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा. लि.' या एजन्सीला 'एचएसआरपी' तयार करणे व लावण्याचे काम देण्यात आले. यात 'एमएच ०२, एमएच ४३, एमएच ०७, एमएच १६, एमएच १५, एमएच १७, एमएच १८, एमएच १९, एमएच ५४, एमएच ५२, एमएच १०, एमएच५०, एमएच ४५, एमएच ४२, एमएच २३, एमएच २१, एमएच ४४, एमएच २४, एमएच ५५, एमएच २५, एमएच २२, एमएच ३८, एमएच ३०, एमएच २८, एमएच ५६, एमएच ३६, एमएच ३४ या आरटीओ कोडमधील जुन्या वाहनांचा समावेश असणार आहे.

झोन १ मधील जुन्या वाहनांची जबाबदारी रोस्मर्टा सेफ्टी सिस्टमकडे झोन १ मधील जुन्या वाहनांसाठी नंबरप्लेट तयार करणे व लावण्याची जबाबदारी रोस्मर्टासाठी सेफ्टी सिस्टम लिमिटेड या एजन्सीला देण्यात आली. यात 'एमएच ४७, एमच ०४, एमएच ४६, एमएच ०९, एमएच १२, एमएच २६, एमएच २७, एमएच ३७, एमएच २९, एमएच ४९, एमएच ३१, एमएच ५१ या आरटीओ कोडमधील जुन्या वाहनांचा समावेश असेल.

झोन २ मधील जुन्या वाहनांची जबाबदारी रिअल मॅझॉन इंडियाकडे झोन २ मध्ये रिअल मॅझॉन इंडिया लि. एजन्सीला 'एचएसआरपी तयार करणे व लावण्याचे काम देण्यात आले. यात एमएच ०१, एमएच ०३, एमएच ८, एमएच ०५, एमएच ०६, एमएच ०८, एमएच ४१, एमएच ३९, एमएच ११, एमएच ५३. एमएच १४, एमएच १३, एमएच २०, एमएच ३२, एमएच ४०, एमएच ३५ या आरटीओ कोडमधील जुन्या वाहनांचा समावेश असणार आहे.

"वाहने चोरी, वाहन अपघात व एखाद्या गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' महत्त्वाची ठरते. हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून ही नंबरप्लेट तयार केली जाते. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडून 'एचएसआरपी' लावून मिळणार आहे." - विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर