जिल्ह्यातील एकूण आगार - ८
एकूण शिवशाही बसेस - ३७
सध्या सुरू असलेल्या शिवशाही - ३७
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
१) नागपूर-पुणे
२) नागपूर-औरंगाबाद
३) नागपूर-हैदराबाद
४) नागपूर-आदिलाबाद
५) नागपूर-भंडारा
६) नागपूर-अमरावती
शिवशाही बसेसचे अँटी मायक्रो बिअल कोटिंग
-कोरोनापासून बचाव करण्यासाठी एसटी महामंडळाने सर्वच बसेसमध्ये अँटी मायक्रो बिअल कोटिंग केले आहे. नागपूर विभागातील ३७ शिवशाही बसेसमध्ये हे कोटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या प्रवाशाच्या हातावर कोरोनाचे विषाणू असले आणि त्याने बसमधील कोणत्याही भागाला स्पर्श केल्यास ते विषाणू नष्ट करण्याची क्षमता या कोटिंगमध्ये आहे. त्यामुळे आता प्रवासी शिवशाही तसेच लालपरीने बिनधास्त प्रवास करू शकणार आहेत.
सर्वच मार्गांवर प्रतिसाद
‘सध्या एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, आदिलाबाद, भंडारा आणि अमरावती येथे शिवशाही बसेस सुरू आहेत. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
..............